सावधान ! ‘हॅकर्स’ तुम्हाला हार्टअ‍ॅटॅक आणू शकतात, ‘MRI’ रिपोर्टमध्येही ‘गडबड’ करू शकतात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या गुन्हेगारी जगतात सायबर क्राईम दिवसाला वाढत आहेत. आधी अकाऊंट मेल हॅक होण्याच्या बातम्या वाचल्या होत्या. त्यानंतर सोशल मिडिया अकाऊंट हॅकिंगच्या बातम्या येत होत्या. आता तर स्मार्ट टीव्ही हॅकिंग होण्याची बातमी समोर येत आहे. ही बातमी सर्वांसाठीच धक्कादायक आहे. मागील आठवड्यात गुजरातमधील सुरतमध्ये स्मार्ट टीव्ही हॅकिंगची दोन प्रकरणे समोर आली.

सावधान! आपको हार्ट अटैक तक करवा सकते हैं हैकर्स, MRI रिपोर्ट भी कर सकते हैं गड़बड़ी

टीव्ही हॅकिंग प्रकरणात टीव्ही हॅक करून हॅकरने बेडरुममधील काही खासगी क्षण शूट केले. त्यानंतर ते इंटरनेटवर अपलोडही केले. हे व्हीडिओ पाहिल्यानंतर तपासकर्त्यांनी सायबर तज्ञाची मदत घेतली. या सायबर-तज्ञाने इंटरनेटवरून व्हिडिओ हटविला होता. मात्र या प्रकरणातून हे सिद्ध होते की स्मार्ट डिव्हाइस ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी) देखील सहजपणे हॅक केले जाऊ शकतात.

स्मार्ट टीव्ही ला इंटरनेट कनेक्ट करता येते किंवा अशा पद्धतीच्या कोणत्याही स्मार्ट डिवाइसला आपल्या आवाजाने ऑपरेट केले जाते अशा टेक्नॉलॉजीला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हतातत. त्यात Google Assistant और Siri हे आहेत.

आयओटीने केलेल्या Analytics नुसार, सध्या जगभरात ८.३ अब्ज आयओटी उपकरण आहेत. ज्याची संख्या २०२१ पर्यंत ११.६ अब्ज होणार आहे. मागील वर्षात म्हणजे २०१८मध्य ७ अब्ज आयओटी उपकरण होती. या डिव्हाइसेसमध्ये आयओटी वस्तुंचा समावेश आहे. मात्र त्यात स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप आणि निश्चित लाइन फोन या उपकरणांचा यात समावेश होत नाही.

मॅकिन्से ग्लोबल इंस्टीट्यूटने यावर एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार १२७ नवीन आयओटी डिव्हाइसेस प्रत्येक सेकंदाला इंटरनेटशी जोडले जात आहेत.

दरम्यान, यावर सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी त्यांची मते मांडली आहेत. त्यांच्यानुसार आजचे हॅकर्स इतके शक्तिशाली झाले आहेत की वैद्यकीय अॅप हॅक केले तर ते वापरणाऱ्या ग्राहकांच्या जीवावर बेतू शकते. यूकेच्या रॉयल अॅकॅडमी ऑफ इंजीनियरिंगने गेल्या वर्षी अहवाल जारी केला आहे. त्यानुसार एमआरआय स्कॅनर, पेसमेकर कनेक्ट केलेले हेल्थ डिव्हाइसेस हॅक केले जाऊ शकतात आणि हॅकर्सना हे पाहिजे असल्यास, ते रुग्णांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान आणू शकतात, असं या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे हे अधिक भयावह आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा विकास होतोय यावर खुश व्हावे की दुखी व्हावे हे समजणे अवघड झाले आहे.

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात