‘WhatsApp’वर ‘हॅकर्स’ची नजर ! तुमच्या फोनमध्ये घुसू देऊ नका, जाणून घ्या काय करायचं अन् काय नाही

पोलीसनाामा ऑनलाईन : दोन दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपवरुन हेरगिरी केली जात असल्याचा मोठा खुलासा केला जात आहे. याचा खुलासा खुद्द व्हॉट्सअ‍ॅपने केला आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अनेक वकील, पत्रकार, मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केली जात आहे . या अहवालानुसार या कथित हेरगिरीमध्ये भारतीयांसह जगातील १४०० हून अधिक लोकांचे फोन हॅक करण्यात आले होते.

व्हॉट्सअ‍ॅपने दिलेल्या माहितीनुसार एका इस्रायली कंपनीच्या स्पायवेअरद्वारे भारतीय पत्रकार, वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी हेरगिरी केली जात आहे . व्हॉट्सअ‍ॅपच्या म्हणण्यानुसार, मे महिन्यात त्यांना सायबर हल्ल्याची माहिती मिळाली ज्यामध्ये त्याच्या व्हिडिओ कॉलिंगद्वारे वापरकर्त्यांस मालवेयर पाठविण्यात आले . व्हॉट्सअ‍ॅपवर या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी हि माहिती संदेशाद्वारे या वापरकर्त्यांना दिली. ज्यांची हेरगिरी करण्यात आली त्यांची नावेही समोर आली आहेत,

जगभरात व्हॉट्सअ‍प वापरणार्‍या लोकांची संख्या सुमारे दीड अब्ज आहे आणि भारतात सर्वाधिक ४० कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. अशा परिस्थितीत आपण आपल्या गोपनीयतेचे रक्षण सुरक्षितता बाळगणे महत्वाचे आहे.

– फोनमध्ये फक्त आवश्यक अ‍ॅपच स्थापित करा. अज्ञात कोणतेही अ‍ॅप कधीही स्थापित करू नये.
– सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या अ‍ॅप्सवर नजर ठेवा.
-अ‍ॅपचा वापरावर सावधगिरी बाळगा.
– त्यासाठी अ‍ॅपच्या वागणुकीमध्ये फोनमध्ये विचित्र जाहिराती दिसतील.
-गेमिंग, पॉर्न, फोटो अ‍ॅपद्वारे अधिक हल्ले होण्याची शक्यता .
– सुरक्षित प्लॅटफॉर्मवरून नेहमी अ‍ॅप स्थापित करा. म्हणजेच प्ले स्टोअर, iOS सारख्या प्लॅटफॉर्म अ‍ॅप्स स्थापित करा.
– मोबाइलमध्ये अँटी-व्हायरस देखील समाविष्ट करणे आवश्यक आहे.

कोणत्या सॉफ्टवेअरवरून हेरगिरी ?
इस्राईलच्या एनएसओ ग्रुपवर हॅकिंगचा आरोप आहे. त्यासाठी pegasus नावाचा स्पायवेअरचा वापर करण्यात आला आहे. या माध्यमातून जगभरातील १४०० जणांची हेरगिरी करण्यात आली आहे. pegasus सॉफ्टवेअर २०१६ मध्ये चर्चेत आले. pegasus हा एक गुप्तचर सॉफ्टवेअर असल्याचे अँटी-व्हायरस कंपनी Kaspersky उघड केले होते.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या