Hacking EC Website | खळबळजनक! निवडणूक आयोगाची वेबसाइट ‘हॅक’ करून हजारो बनावट वोटर आयडी बनवणारा अटकेत, EC चा कर्मचारीही गजाआड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Hacking EC Website | भारतीय निवडणूक आयोगाची वेबसाइट हॅक करून (hacking into the Election Commission of India’s website) बनावट मतदार ओळखपत्र (fake voter ID) बनवण्याच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात एका आरोपीला उत्तर प्रदेशच्या सहारनपुर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सहारनपुर एसएसपी एस. चेनप्पा (SSP S. Chenappa) यांनी सांगितले की, आरोपीचे नाव विपुल सैनी असून (accused Vipul Saini) जिल्ह्यातील नकुड परिसरात त्याचे कम्प्यूटर ऑपरेटरचे दुकान आहे.

कर्मचारी करतो डाटा एंट्रीचे काम
आरोपी विपुल सैनी आपल्या दुकानातील कम्प्यूटरवरूनच भारतीय निवडणूक आयोगाची वेबसाइट हॅक करत होता. तर या प्रकरणात निवडणूक आयोगाच्या एका कर्मचार्‍या सुद्धा अटक केली आहे (An Election Commission employee has also been arrested). हा कर्मचारी निवडणूक आयोगात डाटा एंट्रीचे काम करतो.

अधिकार्‍यांचे धाबे दणाणले
मीडिया रिपोर्टनुसार, निवडणुक आयोगाला आपल्या वेबसाइटमध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्याची शंका आली, परंतु जेव्हा याचा तपास करण्यात आला तेव्हा वेबसाइट हॅक झाली असल्याचे समजले. हे समजताच एकच खळबळ उडाली. अधिकार्‍यांचे धाबे दणाणले. यानंतर एजन्सीजला या हॅकिंगची माहिती देण्यात आली.

ठोस पुरावे मिळाल्यावर अटक
पोलीस आणि एजन्सीच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये वेबसाइट हॅक करणारा आरोपी विपुल सैनीवर संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर सहारनपुर पोलिसांना विपुल सैनी आणि त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. जेव्हा पोलिसांना ठोस पुरावे आढळले तेव्हा सैनीच्या घरावर आणि दुकानावर छापेमारी करून अटक करण्यात आली.

गुन्ह्यासाठी कर्मचार्‍याने वापरला आयडी, पासवर्ड
तर या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून एक अधिकृत वक्तव्य आले आहे.
निवडणूक आयोगान आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, AERO ऑफिसच्या एका डेटा एंट्री ऑपरेटरने बेकायदेशीर प्रकारे सहारनपुरच्या नकुडमध्ये एका अनाधिकृत प्रायव्हेट सर्व्हिस प्रोव्हायडरला आपला यूजर आयडी आणि पासवर्ड शेयर केला होता.
माहिती मिळाली आहे की, वोटर आयडी प्रिंट करण्यासाठी असे केले होते.
दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाचा डेटाबेस पूर्णपणे सुरक्षित आहे.

 

तीन महिन्यात बनवली 10 हजार बनावट कार्ड

याप्रकरणी एसएसपी चेनप्पा यांनी सांगितले की,
आरोपी विपुल सैनी मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यात राहणार्‍या अरमान मलिकच्या इशार्‍यावर काम करत होता.
या दरम्यान त्याने मागील तीन महिन्यात दहा हजारपेक्षा जास्त बनावट वोटर आयडी बनवली आहेत (created more than 10,000 fake voter IDs in the last three months).
सायबर सेल आणि सहारनपुर गुन्हे शाखेच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये गुरुवारी आरोपी विपुल सैनीला अटक करण्यात आली.

Web Title :-  Hacking EC Website | accused arrested for creating fake voter id by hacking election commission website

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Police Officer Suicide | धक्कादायक ! रस्त्याच्या कडेलाच केली पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या, प्रचंड खळबळ

Pimpri News | लिफ्टमध्ये अडकलेल्या अल्पवयीन मुलाचा भिंत फोडून वाचवला जीव; म्हणाला – ‘मला पुनर्जन्मचं मिळाला…’

Song Sakhiyan 2 Releases | अक्षय कुमार आणि वाणी कपूरच्या चित्रपटाचे गाणे झाले रिलिज, पहा व्हिडिओ