Hadapsar Assembly Election 2024 | ‘तळ्यात मळ्यात’च्या भूमिकेने हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्यापुढील आव्हान वाढले?

Hadapsar Assembly Election 2024 | Has the role of 'Talaat Malaat' increased the challenge to Hadapsar MLA Chetan Tupe?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Hadapsar Assembly Election 2024 | अखेरपर्यंत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Sharad Pawar NCP) प्रवेश करण्याचे प्रयत्न करणारे अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) यांच्यापुढील आव्हान वाढले आहे. नगरसेवक असताना ते ज्या मगरपट्टा साडेसतरानळी आणि मुंढवा भागातून प्रतिनिधित्व करायचे त्या भागातील सर्व नगरसेवक शरद पवार गटात आहेत. त्याचवेळी मुस्लिम आणि दलीत समाज मोठ्या संख्येने असलेल्या मतदार संघात महाविकास आघाडीने शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांना उमेदवारी दिल्याने हे शिवधनुष्य पेलणे तुपे यांच्यासाठी आव्हानात्मक ठरणार आहे.

उमेदवारी अर्ज माघारीनंतर हडपसर मतदार संघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. विद्यमान आमदार चेतन तुपे, महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे प्रशांत जगताप आणि मनसे चे साईनाथ बाबर (Sainath Babar) अशी तिरंगी लढत येथे होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटिनंतर हडपसर मधील बहुतांश नगरसेवक आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले. एवढेच काय तर चेतन तुपे ज्या प्रभागात नगरसेवक होते तेथील बंडू गायकवाड, हेमलता निलेश मगर, कोद्रे हे देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेले. तत्पूर्वी शिवसेनेतील फुटीनंतर येथील बहुतांश शिवसैनिक उद्धव ठाकरे गटात राहिले. महविकास आघाडी मध्ये याला काँग्रेसची जोड मिळाल्यानंतर त्याचे लोकसभा निवडणुकीत परिणाम दिसून आले.

त्यामुळे ‘तळ्यात मळ्यात’ अशी भूमिका घेत वर्षभरापूर्वी अजित पवार गटात गेलेल्या चेतन तुपे यांनी गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार गटामध्ये जाण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. परंतु पक्षाने शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आणि प्रतिकूल परिस्थीत शहर अध्यक्ष पदी नेटाने काम करणाऱ्या प्रशांत जगताप यांच्यावर विश्वास व्यक्त केला. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजांची समजूत काढून त्यांना सोबत घेण्यापासून अगदी काल माघारीच्या वेळी मित्र पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या (Shivsena Thackeray Group) अपक्ष उमेदवाराची यशस्वी माघार घेत त्यांना आपल्या सोबत घेत नेतृत्व सिद्ध केले. यामुळे तुपे यांची डोकेदुखी वाढली आहे.

Total
0
Shares
Related Posts