Hadapsar News | कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चांगले संस्कार होणे गरजेचे – वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Hadapsar News | रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी (Pune Police) अभ्यासिकेतील बाल आणि तरुण मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी इफ्तार पार्टीचे (Iftar Party) आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यावेळी हडपसर पोलीस स्टेशनचे (Hadapsar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police  Inspector Arvind Gokule) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कायदा व सुव्यवस्था (Law and Order) अबाधित राखण्यासाठी सामाजिक सलोखा व चांगले संस्कार बाल व तरुण वयात होणे गरजेचे असल्याचे मत अरविंद गोकुळे यांनी व्यक्त केले. (Hadapsar News)

 

 

शिवसमर्थ संस्थेच्यावतीने (Shivsamarth Sanstha) महात्मा फुले वसाहत येथील तुळजाभवानी माता मंदिरात महाआरती व रोजे इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास उपस्थित अभ्यासिकेतील बाल व तरूण विद्यार्थ्यांना अरविंद गोकुळे यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे. यावेळी पोलिस निरीक्षक दिगंबर शिंदे (Police Inspector Digambar Shinde), पत्रकार दिपक वाघमारे (Journalist Deepak Waghmare) डॉ.शंतनू जगदाळे (Dr. Shantanu Jagdale), अनिल सरडे (Anil Sarde), बापू जगताप (Bapu Jagatp), निरंजन शितोळे (Niranjan Shitole), पार्थ  वाघमारे (Partha Waghmare), शौकत शेख (Shaukat Shaikh), संतोष जाधव (Santosh Jadhav), हमीद शेख (Hamid Shaikh) आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे आयोजन शिवसमर्थ संस्थेच्या अध्यक्षा मनीषा वाघमारे (Manisha Waghmare) यांनी केले होते. (Hadapsar News)

अरविंद गोकुळे म्हणाले, सामाजिक एकता सलोखा व बंधुता हा विचार बालवयातच रुजवणे गरजेचे आहे.
शिक्षण संस्कार यांबरोबरच (Education Rites) सामाजिक संस्कार रुजवलेली  संस्कारक्षम पिढी उज्ज्वल भारताचे (Bright India) भविष्य आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सामाजिक सलोखा व चांगले संस्कार बाल व तरुण वयात होणे गरजेचे आहे.
त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी केले.

 

Web Title :- Hadapsar News | Good manners are needed to maintain law and order – Senior Police Inspector Arvind Gokule

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule On Amruta Fadnavis | ‘मी अमृता फडणवीस यांना ट्विटरवर फॉलो करत नाही’ – सुप्रिया सुळे

 

Jalgaon Crime | नारदाच्या गादीवर बुटासहीत पाय ठेवणाऱ्या पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी वारकरी संप्रदायाची मागितली जाहीर माफी, म्हणाले…

 

Pune Aam Aadmi Party | टँकर माफियांचा पुणे शहराला विळखा ! पाणी प्रश्नावर सवंग राजकारण नको; पाणी द्या, नाहीतर टँकरचे पैसे द्या – AAP ची मागणी