हडपसर पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कुंडली पुस्तिका प्रकाशित

पुणे :  पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर पोलिसांनी त्यांच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांची एक अद्यावत पुस्तिका तयार केली असुन त्याचे प्रकाशन करण्यात आले आहेत. पुस्तिकेमध्ये एकुण 436 गुन्हेगारांची माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे. ही पुस्तिका पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि अंमलदारांकडे देण्यात आली असुन त्यावरून पोलिस आता गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवणार आहेत.

अप्पर आयुक्‍त सुनिल फुलारी, उपायुक्‍त प्रकाश गायकवाड, सहाय्यक आयुक्‍त सुनिल देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे. पुस्तिकेत चैनचोरी करणार्‍या 15, हत्यार बाळगणार्‍या 14, दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या 24, दिवसा व रात्री घरफोडया करणार्‍या 18, हिस्ट्रीशिटर असलेल्या 25, बॉडी ऑफेन्स असलेलेल्या तसेच दोन पेक्षा अधिक गुन्हे असलेल्या 113, रेकॉर्डवरील 37 गुंड, तडीपार असलेल्या 7 आणि सन 1999 पासुन दि. 31 डिसेंबर 2018 पर्यंत पाहिजे असलेल्या एकुण 183 आरोपींची अद्यावत माहिती तसेच फोटो देण्यात आला आहे.

पेट्रोलिंग दरम्यान या पुस्तिकाचा चांगला फायदा पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना होणार आहे. वरिष्ठ निरीक्षक सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षे हेमराव कुंभार, सहाय्यक निरीक्षक संजय चव्हाण, प्रसाद लोणारे, उपनिरीक्षक मंगेश भांगे, कर्मचारी जगदीश पाटील, प्रमोद टिळेकर, अमोल घावटे, सैदोबा भोजराव, चिवळे आणि मुंढे यांनी ही पुस्तिका तयार केली आहे.