ध्वनी प्रदुषण करणाऱ्या गणेश मंडळांवर हडपसर पोलिसांची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

डीजे लावण्यास बंदी असताना देखील मगरपट्टा परिसरातील गणेश मंडळांनी मोठ्या आवाजात डिजे लावून ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन केले. ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळावर कारवाई करुन पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षावर गुन्हा दाखल केला. तसेच डिजे मालकावर देखील कारवाई करुन साऊंड सिस्टीम जप्त केली. ही कारवाई बुधवारी (दि.१९) सायंकाळी अखिल भोरी भडक मित्र मंडळावर करण्यात आली.
[amazon_link asins=’B078124279,B078M16N8P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a1f164ca-bcee-11e8-83ee-81c67dd43e0c’]

हडपसर पोलिसांनी कर्कश आवाजात डिजे लावल्या प्रकरणी मंडळाचा अध्यक्ष चंदन कैलास तुपे, उपाध्यक्ष सुजीत दिलीप माने आणि डिजे मालक साहील सय्यद मुन्नावर (रा. वानवडी) यांच्यावर पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार आणि ध्वनी प्रदुषण नियमन व नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गणेस मंडळांच्या पदाधिकारी यांना भविष्यात मोटार परवाना व पासपोर्ट मिळवण्यासाठी अडचणी येऊ शकतात असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दुसऱ्या घटेनेत मांजरी येथील सात दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत राजहंस गणेश मित्र मंडळाने वाहनामध्ये बदल करुन कर्कश आवाजात डिजे लावला होता. सायंकाळी मिरवणूक चालू असताना सहायक पोलिस निरीक्षक काळे व पोलीस उप निरीक्षक गिरी यांनी आवाजाची डेसीबल पातळी तपासली. त्यावेळी आवाजाची पातळी १०० च्या वर असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष गिरीश कानकाटे व डीजे मालक राजू तावडे यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच राजू तावडे याचे डिजेचे साहित्य जप्त केले.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, सुनिल फुलारी, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे, पोलीस उपनिरीक्षक गिरी यांच्या पथकाने केली.
[amazon_link asins=’B079Q64PW6,B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a7f1a5d4-bcee-11e8-9409-252ce687d4ff’]

हडपसर परिसरात गणेशोत्सव दरम्यान नवव्या व दहाव्या दिवशी अशाच पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे यांनी गणेश मंडळांना केले आहे.