पुणे : Hadapsar Pune Crime News | ब्लॉक ओरा क्लासिक या यु ट्युबर चॅनलधारकाने ब्लॅक ओरा या नावाने क्रिप्टो करन्सी (Cryptocurrency) काढून त्यात गुंतवणुक केल्यास १५ महिन्यात तीन पट पैसे देण्याचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी १५ लाख रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे परत मागितल्यावर जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली आहे.
याबाबत विनोदकुमार शेखरन वनीयेर (वय ३०, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी इसाक बागवान (रा. सांगली), फाऊंडर इस्माईल, दस्तगीर पटेल, जहांगिर खान, जिशान रियाज हेबळीकर आणि ब्लॉक ओरा क्लासिक या यु ट्युबर चॅनल धारक रवी निले यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार फुरसुंगी येथील भेकराईनगरमधील अर्निग आर्ट ऑफिस येथे १८ जानेवारी २०२२ ते आतापर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसाक बागवान हा कोअर ग्रुपचा सदस्य असून त्याचे इतर साथीदार हे ब्लॉक ओरा क्लासिक हा यु ट्युबर चॅनल धारक यांनी ब्लॅक ओरा या नावाने क्रिप्टो करन्सी काढली. त्याची प्रायमेरी किंमत ५० रुपये आहे. त्यामध्ये गुंतवणुक केल्यास १५ महिन्यात तुम्हाला तीन पट रक्कमेतून दररोज १ टक्के प्रमाणे मिळेल. तुम्ही आणखी लोकांची तुमच्या मार्फत जेवढी गुंतवणुक केल्यास त्यावर डायरेक्ट ५ टक्के रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल, असे सांगितले. फिर्यादी यांना खोटी आश्वासने दिली. फिर्यादी यांनी आरोपीकडे एकूण ४० लाख रुपयांची गुंतवणुक केली.
त्यामध्ये फिर्यादी यांना एकूण २८ लाख रुपये रुपये परतावा मिळाला. परंतु, त्याचे पैसे फिर्यादी यांना न देता, त्यांना मिळालेले २८ लाख रुपये आरांपी यांनी परत फिर्यादीचे वेगवेगळे युजर आय डी तयार करुन त्यामध्ये गुंतवणुक केली. त्याशिवाय फिर्यादी यांनी त्यांचे मित्र परिवार यांनी मिळून एकूण २ कोटी १५ लाख रुपये गुुंतवणुक म्हणून स्वीकारलेली आहे. ते फिर्यादी यांना देणे आहे. आरोपी यांनी फिर्यादी व इतरांना नोटरी करारनामा करुन दिलेला आहे. फिर्यादी यांनी आरोपींना पैसे परत मागितल्यावर त्यांनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.