Hadapsar Pune Crime News | कर्जाचे हप्ते भरण्यासाठी वडिलांकडून पैसे आणत नसल्याने 23 वर्षाच्या विवाहितेचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : Hadapsar Pune Crime News | कर्जाचे हप्ते भरण्यासाठी वडिलांकडून पैसे आणून न दिल्याने विवाहितेचा ओढणीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एका २३ वर्षाच्या विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिचा पती (वय ३१), सासु (वय ५६), सासरे (वय ६०), नंणद (वय ३९) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२२ ते २ एप्रिल २०२४ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सध्या त्यांच्या माहेरी रहात आहेत. त्या पती याच्यासह राहत होत्या. त्यांचे पती, सासु, सासरे, नणंद यांनी त्यांच्या वडिलांकडून आरोपी यांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी पैसे दिले नाही. या कारणावरुन फिर्यादी यांचा शारीरीक व मानसिकर् छळ केला. फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन फिर्यादी यांचे व्हिडिओ व्हारयल करण्याची धमकी दिली. फिर्यादीचे पती व नणंद यांनी फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यांचा ओढणीने गळा आवळला. फिर्यादी यांनी आपली सुटका करुन घेऊन त्या माहेरी गेल्या. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या (Phursungi Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोढवे (PI Mangal Modhave) तपास करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts