पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Hadapsar Pune Crime News | व्याजासह सर्व रक्कम दिली असताना चेक बाऊन्स करण्याची धमकी देऊन आणखी पैशांची मागणी करणार्या सावकारावर हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कोंढव्यातील ६३ वर्षाच्या नागरिकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमेश दत्तात्रय शिर्के (वय ४९, रा. गोडबोले वस्ती, मांजरी) आणि वैशाली अरविंद बहिरट (वय ४२, रा. मांजरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हा प्रकार १४ जुलै २०२२ ते आजपर्यंत घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी उमेश शिर्के याच्याकडून २५ लाख रुपयांचे व्याजाने पैसे घेतले होते.
त्यानंतर त्यांनी व्याज व मुद्दल असे ३३ लाख २३ हजार रुपये परत केले.
जादाचे पैसे जबरदस्तीने व्याज स्वरुपात घेतले. फिर्यादी यांना अपरात्री कॉल करुन त्रास देत होता.
फिर्यादी यांना चेक बाऊन्स करण्याची भिती दाखवून आणखी पैशांची मागणी करुन फिर्यादींना धमकी दिली. पोलीस निरीक्षक जगदाळे तपास करीत आहेत.(Hadapsar Pune Crime News)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
हे देखील वाचा