पुणे : Hadapsar Pune Crime News | नळाला पाणी आल्याने पाणी लवकर भरुन घे, हे सांगण्यासाठी एक महिला त्यांच्या घरात गेली. तेव्हा ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आल्याने खूनाचा प्रकार उघडकीस आला. (Hadapsar Murder Case)
आरती देबीलाल सरेन (वय ३५, रा. शिंदे वस्ती, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) देबिलाल लक्ष्मणचंद्र सरेन (रा. शिंदे वस्ती, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो पश्चिम बंगालला पळून गेला आहे.
याबाबत घरमालक दत्तात्रय शंकर चौधरी (वय ५५, रा. तुकाईदर्शन) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ हा प्रकार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ ते ५ ऑक्टोबर पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घरात देबिलाल सरेन हा भाडेकरु म्हणून रहात होते. तो मजूरी करत असे. कोणत्यातरी कारणावरुन पतीपत्नीत भांडणे झाली. त्यामध्ये देबिलाल याने पत्नी आरती हिच्या डोक्यात व संपूर्ण शरीरावर हत्याराने मारहाण करुन तिला गंभीर जखमी केले. त्यात तिचा मृत्यु झाला. शुक्रवारी सकाळी ते शनिवारी पहाटेच्या दरम्यान घडली.
शनिवारी पहाटे त्यांच्या वस्तीत नळाला पाणी आले. पण, सरेन याच्या घरातून कोणी पाणी भरण्यासाठी आले नाही.
तेव्हा वस्तीतील एक महिला आरती हिला पाणी भरण्यासाठी सांगण्यासाठी गेली.
तेव्हा घरात ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे,
पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, सहायक पोलीस निरीक्षक कुदळे, जौजाळ,
बर्गे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. देबिलाल सरेन हा आपल्या गावी पळून गेला असल्याचा संशय आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुतार तपास करीत आहेत. (Hadapsar Pune Crime News)
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
पोलीसनामाच्या इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/policenamaa
Shirur Assembly Constituency | शिरूर विधानसभा मतदारसंघातूनही अजित पवारांना विरोध;
ते भाजपचे कधीच होऊ शकत नाहीत, भाजप पदाधिकाऱ्यांचा पवित्रा
Eknath Shinde-Bachchu Kadu | मुख्यमंत्री शिंदेंचा बच्चू कडूंना झटका; विधानसभेच्या तोंडावर आमदार साथ सोडणार;
बच्चू कडू म्हणाले – ‘शिंदेंनी जो एक घाव केला त्याच्यावर आम्ही…’