Hadapsar Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार दिल्याने तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Hadapsar Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक (Physical Relationship) संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने हाताची नस कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempt To Suicide) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2023 ते 22 एप्रिल 2024 दरम्यान शेवाळवाडी (Shewalwadi), मांजरी (Manjari) , हडपसर परिसरात घडला आहे. (Rape Case Pune)

याबाबत सातारा जिल्ह्यातील 23 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. यावरुन दत्तात्रय कैलास कदम (Dattatraya Kailas Kadam) (वय-25 रा. शिवतेजनगर, काळेपडळ, हडपसर, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आणि आरोपीची ओळख ऑक्टोबर 2023 मध्ये झाले. आरोपीने मुलीसोबत ओळख वाढवून ‘आय लव्ह यू, मला तू खूप आवडतेस’ असा मेसेज करुन लग्न करण्याचे खोटे आश्वासन दिले.

त्यानंतर आरोपीने तरुणीला वेळेवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
आरोपीने लग्न करण्यास नकार देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | असा पोरकटपणा दाखवाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा विजय कधीच होत नाही, पुरावे माझ्याकडेही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा

Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी