कराटे क्लासमध्ये जुळले सुत, तरुणाने लग्नाला नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तीन वर्षांपासून ती कराटे क्लासला जात होती. तिथे एका तरुणाशी सुत जुळले. त्याने लग्नाचे अमिष दाखवले. त्यानंतर तिला अचानक लग्नाला नकार दिला. म्हणून एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

अंकीता सुनिल गजरे (वय 19, रा. मांजरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय दादू मस्तूद याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदीका गजरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकीता ही फुरसुंगी येथील एका खासगी कंपनीत नोकरीस होती. तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तर, अक्षय हा औषधांच्या सिरम कंपनीत नोकरी करत होता. अंकीता मागील ३ वर्षांपासून एका शाळेत खासगी कराटे क्लासला जात होती. त्यावेळी त्याठिकाणी अक्षयही येत होता. कराटे क्लासमध्ये दोघांची ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले.  त्याने तिला लग्न करण्याचे अमिष दाखवले. तिला लग्नाचे वचनही दिले. परंतु अचानक त्याने लग्नाला नकार दिला. यामुळे नैराश्य आल्याने अंकिताने बुधवारी रात्री साडे सात वाजण्याचे सुमारास राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्. केली. त्यानंतर तिच्या कुटूंबियांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला उपनिरीक्षक बांबे या करत आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like