Haddi Movie | ‘हड्डी’ चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबर स्क्रीन शेअर करणार ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

पोलीसनामा ऑनलाईन टीम : नुकताच ‘हड्डी’ (Haddi Movie) चित्रपटातील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी (Nawazuddin Siddiqui) चा लुक जोरात व्हायरल झाला होता. त्याच्या या लूकने प्रेक्षक हक्काभक्का झाले होते. त्याने या चित्रपटात स्त्रीवेशातील एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तो हिरव्या रंगाची साडी, नाकात चमकी, कपाळावर मोठी टिकली, भडक लीपस्टिक अशा लुक मध्ये दिसला होता. त्याचा हा लूक पाहून सध्या प्रेक्षक हड्डी (Haddi Movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या फोटोत नवाजुद्दीन बरोबर एक मराठी अभिनेत्री ही दिसली. या चित्रपटाच्या माध्यमातून ती नवाजुद्दीन सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

 

ही अभिनेत्री म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील पहिली ट्रांसजेंडर अभिनेत्री गंगा (Ganga). गंगा ने तिच्या कामामुळे आणि स्वभावामुळे मराठी सिनेसृष्टीत स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली आणि तिच्या अभिनयाने तिचे चाहते देखील तोंड भरून कौतुक करतात. ‘कारभारी लयभारी’ (Karbhari Laybhari) या मालिकेत तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. तर ‘युवा डान्सिंग क्वीन’ (Yuva Dancing Queen) या रिअ‍ॅलिटी शोच्या सूत्रसंचालनाच्या भूमिकेतदेखील ती दिसली होती. तिच्या या दोन्ही भूमिकेमुळे तिने चाहत्यांची मने देखील जिंकली होती. आता नवाजुद्दीन सिद्दिकीने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांच्याबरोबर गंगादेखील दिसली होती. तर आता गंगा नवाजुद्दीन सिद्दिकीच्या हड्डी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

नवाजुद्दीनने शेअर केलेल्या फोटोमध्ये गंगाही दिसत आहे. या चित्रपटात तिची महत्त्वाची भूमिका देखील असणार आहे.
परंतु तिची भूमिका नेमकी काय आणि कशी असणार हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
नवाजुद्दीनने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिला पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आणि तसेच तिला शुभेच्छा दिल्या.
तर सध्या गंगाचे चाहते तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
हड्डी या चित्रपटात नवाजुद्दीन स्त्री आणि तृतीयपंथी अशा दोन्ही भूमिकेत दिसणार आहे.
जवळपास चार वर्षापासून नवाजुद्दीन या चित्रपटावर काम करत होता.
हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

 

Web Title :- Haddi Movie | pranit hatte will be sharing screen with nawazuddin siddiqui in haddi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा