हडपसरमध्ये तरुणाचा चाकूने सपासप वार करुन खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –आर्थिक व्यवहारातून एका मित्राने दुसऱ्या मित्राचा चाकूने सपासप वार करुन खून केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. ही घटना आज (सोमवार) हडपसर येथील अंगुर वाईन्स समोर रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

राहुल पाटील (रा. जळगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राहुल पाटील आणि त्याच्या मित्रामध्ये आर्थिक देवाण घेवाणीचा व्यवहार झाला होता. यातूनच त्यांच्यामध्ये आज वाद झाले. आरोपीने सोबत आणलेल्या चाकूने राहुल याच्यावर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागिच मृत्यू झाला. वर्दळीच्या ठिकाणी खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी हडपसर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले असून तपास सुरु आहे.

You might also like