‘टेरर फंडिंग’ केसमध्ये मुंबई च्या 26/11 हल्ल्याचा मुख्य सुत्रधार हाफिज सईद फसला, 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदला पाकिस्तानमधील न्यायालयाने 5 वर्षींचा कारावास सुनावला आहे. टेरर फंडिग केसमध्ये त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली. मागील आठवड्यात लाहोरच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएसने) प्रतिबंधित जमात-उद-दावा (जेयूडी) चा सरगना आणि 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या विरोधात दहशतवादी फंडिंगशी संबंधित दोन प्रकरणात आपला निर्णय राखून ठेवला आहे. ही प्रकरणं दहशतवादी विरोधी पथकाच्या लाहोर आणि गुजरांवाला शाखाद्वारे दाखल करण्यात आली होती.

सीटीडीच्या गुजरांवाला चॅप्टरकडून दाखल करण्यात आलेल्या प्रकरणाची सुरुवात गुजरांवाला एटीसीमध्ये सुनावणीने झाली, परंतु लाहोर उच्च न्यायालयाच्या निर्देशांवर हे लाहोरला वर्ग करण्यात आले होते. दोन प्रकरणातील सुनावणी दरम्यान न्यायालयाने 23 साक्षांकडून जबाब नोंदवून घेतला.

जेयूडी सरगनाच्यला मागील वर्षी जुलैमध्ये सीटीडीद्वारे ताब्यात घेतले गेले होते. त्याच्या अटकेपूर्वी जेयूडी नेत्यांच्या विरोधात 23 एफआयआर सीटीडी पोलीस स्टेशन लाहोर, गुजरांवाला, मुल्तान, फैसलाबाद आणि सरगोधामध्ये जुलै 2019 मध्ये दाखल केल्या होत्या. यात सईद आणि जेयूडीचा आणखी एक प्रमुख दहशतवादी अब्दुल रहमान मक्की देखील सहभागी होते. एका वृत्तानुसार सीटीडीने सांगितले की जेयूडी गैर-वित्तीय संस्था आणि ट्रस्टच्या माध्यमातून जमा केलेले पैशातून दहशतवाद्यांना फंडिंग करत होता.