चेस्ट आणि अंडरआर्मचे केस काढण्यापूर्वी घ्या ‘ही’ काळजी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – विविध फॅशनमुळे महिला वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर स्टाइल करतात. तर पुरुष चेस्टवरील केस काढणे पसंत करतात. तरूणांसह सर्वच वयोगटातील पुरूष छातीवरील केस काढून टाकतात. परंतु, शरीरावरील केस आरोग्यासाठी विविध प्रकारे फायदेशीर ठरतात. आणि याविषयी महिला आणि पुरूषांना अनेकदा माहित नसते.

वय वाढण्यासोबतच केसांची वाढ होत जाते. टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे केस घनदाट आणि काळे होतात. जर पुरुषांच्या छातीवरील केसांची ग्रोथ कमी असेल तर याचा स्पष्ट अर्थ असा होती की, त्यांच्यामध्ये या हार्मोनची कमतरता आहे. परंतु छातीवरील केस कमी असणे म्हणजे याचा अर्थ तुम्ही हेल्दी नाही असाही होत नाही. अनेकवेळा याची वाढ अनुवंशिकतेशी संबंधित असते. आर्मपिटचे केस सामान्यतः पेहराव्यावर परिणामकारक ठरतात. शरीराच्या या भागावरील केस कोणालाच आवडत नाहीत. परंतु या केसांमधून एक प्रकारचे केमिकल फेरोमोन्स निघते. यामुळे शरीरातून एका प्रकरचा सुंगध येतो, जो पार्टनरला सेक्शुअली आकर्षित करतो.

नाकातील केस थोडेसे जरी वाढले तरी लगेच लोक ते कापतात. परंतु, नाकातील केस श्वासाद्वारे शरीरात पोहोचणाऱ्या प्रदूषणाला थांबवतात. हवा या केसांमधून फिल्टर होऊन फुफ्फुसांपर्यंत पोहचते. हे केस काढणे किंवा ट्रिम करणे विविध प्रकारच्या इन्फेक्शनचे कारण ठरू शकतात. यामुळे सर्दी-खोकला यासारखे आजार होऊ लागतात. नाकातील केस जन्मापासूनच उपस्थित असतात परंतु यांची खास गोष्ट म्हणजे हे शरीरावरील इतर केसांप्रमाणे वाढत नाहीत. आयब्रो (भिवया) आणि आयलीड (पापण्या)मुळे चेहऱ्याची सुंदरता वाढते. डोळ्यांचे रक्षणही होते. घाम आणि बाहेरील प्रदूषणापासून हे डोळ्यांचे रक्षण करतात. डोळ्यांच्या निर्माण होणाऱ्या विविध समस्यांपासून हे रक्षण करतात. यामुळे आयब्रो सुंदर दिसण्यासाठी ट्रिम करा. परंतु, पापण्यांसोबत कोणत्याही प्रकारची छेडछाड करू नये. फारच कमी लोकांच्या कानामध्ये किंवा कानावर केस दिसून येतात. हे खूप लहान आणि निरखून पाहिल्यानंतरच दिसतात. हे केस कानांची धूळ आणि प्रदूषणापासून सुरक्षा करतात. तेच कानामध्ये जास्त केस असल्यास त्यामध्ये मळ निर्माण होतो, ज्यामुळे ऐकू कमी येते. यासाठी वेळच्यावेळी कानातील केसांची ट्रीमिंग करणे आवश्यक आहे.

पायांच्या अंगठ्यावरील केस वॅक्सिंग करताना काढून टाकले जातात, कारण यामुळे लुक्सवर प्रभाव पडतो. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का, हे केस ब्लड सक्र्युलेशन दाखवतात. जे केस काढून टाकल्यास पेरिफेरल आर्टरी डिसीज होण्याचा धोका वाढतो. शरीरावरील केस भलेही दिसायला चांगले दिसत नसतील, परंतु हे आपल्या शरीराचे सूर्याच्या हानीकरण अल्ट्राव्हायलेट किरणांपासून रक्षण करतात. तसेच थंडीमध्ये शरीराला गरम ठेवण्याचे काम करतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/