Hair Care | पाहिजे असतील रेखासारखे सुंदर केस; स्वयंपाक घरातील या 4 वस्तूंचा करा वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सुंदर केस (Hair Care) सर्वांना आकर्षित करतात. मुलींना लांब केस खूप आवडतात, पण लांब केस मिळणे तितके सोपे नसते. लांब केसांच्या मार्गात डँड्रफ म्हणजेच कोंडा हा सर्वात मोठा अडथळा आहे. केसांच्या मुळांमध्ये (Hair Care) कोंडा घट्ट होऊन त्यांना कमकुवत बनवतो. जर तुम्हाला लांब आणि सुंदर केस हवे असतील तर कोंडा मुळापासून नष्ट करणे आवश्यक आहे. तुम्हालाही सुंदर, लांब, दाट आणि चमकदार केस मिळवायचे असतील तर काही घरगुती उपाय खूप उपयोगी ठरू शकतात (Hair Care Home Remedies).

 

१. मेथी (Methi)
केसांसाठी मेथी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे केसांना फायदा होतो. मेथी दाणे पाण्यात भिजवून केसांना लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. मेथीची पेस्ट लावल्याने जबरदस्त चमक येते. मेथीमुळे केस मजबूत होतात आणि वाढण्यास मदत होते. (Hair Care)

 

२. कडुलिंब (Neem)
कडुनिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात जे केसांमध्ये साचलेली घाण साफ करण्याचे काम करतात. कडुलिंबाचे पाणी केसांना लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. या पाण्याने केस धुतल्याने केसांची खाजही दूर होते.

३. लसूण (Garlic)
लसणात असलेले पोषक घटक केसांसाठी फायदेशीर असतात. लसूण कोंड्याची समस्या दूर करते. लसूण बारीक करून त्याची पेस्ट थोड्या पाण्यात मिसळून केसांच्या मुळांना लावा. अशा प्रकारे लसूण लावल्याने केसांमधील कोंडा दूर होईल. लसूण मोहरीच्या तेलात गरम करूनही लावू शकता.

 

४. खोबरेल तेल (Coconut Oil)
खोबरेल तेल केसांसाठी खूप फायदेशीर आहे. खोबरेल तेल लावल्याने कोंड्याची समस्या दूर होते. शुद्ध खोबरेल तेल लावल्याने केसांची वाढ व्यवस्थित होऊ लागते. खोबरेल तेलात चमेलीचे फुल मिसळून लावल्याने केस चमकदार होतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Care | home remedies to get rid of dandruff rekha hair care secrets

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Neeraj Chopra | नीरज चोप्राचा आणखी एक पराक्रम! उसेन बोल्टचा ‘तो’ विक्रम मोडला

Malaika Arora | मलायका अरोराला ट्रोल करणाऱ्यांना भारती सिंगने सुनावले खडेबोल; म्हणाली “तुम्ही काय तिचे……”

CM Eknath Shinde | ‘काम करण्याची चर्चा होते, अन् बिनकामाचे मोर्चा काढतात’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खोचक टोला (व्हिडिओ)