Hair Care Routine : कोरड्या आणि गळणाऱ्या केसांपासून आराम मिळवायचा असेल तर जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केसांची सर्वात मोठी समस्या म्हणजे केस कोरडे आणि गळणे. केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. आपण आपल्या केसांवर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल चिंतीत आहात का ? जर आपल्याला असे वाटत असेल की एखादा चांगला आहार घेतल्यानंतर, चांगले तेल वापरुन देखील केस कोरडे व गळणे चालूच आहे. तर केस गळण्याचे कारण जाणून घ्या.

जाड, मऊ आणि रेशमी केस कोणाला आवडत नाही, परंतु ज्याप्रमाणे आपल्या शरीराला देखील चांगल्या आहाराची आवश्यकता असते तसेच आपल्या केसांसाठी देखील चांगला आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे. सुंदर, लांब आणि चांगले केस असावे प्रत्येकाची इच्छा आहे. कोरडे आणि गळणाऱ्या केसांमुळे आपले इंप्रेशन देखील खराब होऊ शकते.

केसांची निगा राखण्यासाठी ५ उपाय
१) केस थंड पाण्याने धुवा
जर आपण हिवाळ्यामध्ये गरम पाण्याने आपले केस धुतले तर ते आपल्या केसांसाठी हानिकारक ठरू शकते. हिवाळ्यात आपण केसांसाठी पाणी कोमट करून केस धुवू शकता. आपल्या टाळूसाठी थंड पाणी खूप फायदेशीर आहे. तसेच, थंड पाण्याने केस धुण्यामुळे केस कोरडे आणि गळत देखील नाहीत.

२) केसांना मॉइश्चराइज्ड ठेवा
केस गळतीचे मुख्य कारण म्हणजे कंडिशनिंग आणि मॉइश्चरायझरचा अभाव. म्हणून केसांना कंडीशन करण्यासाठी एरंडेल तेलाचे काही थेंब केसांना लावा. हे लिव्ह-इन कंडीशनिंगचे काम करेल किंवा शाम्पूच्या आधी आपण टाळूमध्ये मालिश देखील करू शकता.

३) कर्लिंग आणि ट्रिमिंगचा वापर कमी करा
स्टाईलिंग उत्पादने आणि तंत्रज्ञान या दिवसात खूप वापरली जात आहे. परंतु, लक्षात ठेवा हे केस सुंदर बनवण्याऐवजी खराब करू शकते. स्ट्रॉंग स्टाईलिंग स्पामुळे आपले केस कोरडे आणि गळणे सुरू होतील.

४) टॉवेल्सने केस घासू नका
बरेच लोक केस धुतल्यानंतर टॉवेल्सने केस घासतात. हे अजिबात करू नका. त्याऐवजी टॉवेलमध्ये केस ठेवा आणि हलके दाबा आणि पाणी काढून टाका. हे आपले केस कोरडे आणि गळणे होऊ देणार नाही.

५) नारळ तेल वापरा
केस गळती टाळण्यासाठी नारळाच्या दुधात थोडे पाणी घालून त्यामध्ये थोडी कापूर पावडर घाला. हे केसांच्या मुळांवर लावा आणि काही तासांनंतर केसांना शाम्पूने धुवा जेणेकरून केस मुळांपासून सुंदर आणि मजबूत होतील.