‘या’ 5 हेअरस्टाइल कधीही नका करू, केसांवर होतो परिणाम ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्याची देखभाल घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, दिवसातील काही मिनिटे स्वतःसाठी काढणे आवश्यक आहे. एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाताना चांगला ड्रेस, मेकअप परिधान करुन तुम्ही सुंदर दिसू शकता. पण तुमच्याकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी हेअर स्टाइल सुद्धा महत्वाची असते.

परंतु, खराब हेअर स्टाइलमुळे केसांचे नुकसान भरपूर प्रमाणात होते. ऑफिस किंवा घरातील कामाच्या व्यापामुळे वेळे अभावी आपण केस कसेही बांधतो. काही वेळानंतर याचा केसांवर वाईट परिणाम होतो. केस मजबूत आणि घनदाट व्हावेत, म्हणून आपण कित्येक उपाय करत असतो. पण काही केशरचने मुळे भरपूर नुकसान देखील होऊ शकते. तर आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात माहिती सांगणार आहोत.

१. स्ट्रेटनिंग
अनेक तरुणी केसांचे स्ट्रेटनिंग करतात. या ट्रीटमेंटमुळे केस आकर्षक दिसतात. पण त्यासाठी केसांवर मोठ्या प्रमाणावर केमिकलचा वापर करण्यात येतो. त्यामुळे केस कमकुवत होतात. परिणामी केस गळणे, तुटणे अशा समस्या निर्माण होऊ लागतात. शिवाय केसांची नैसर्गिक चमक नाहीशी होते. केस निर्जीव, निस्तेज आणि कोरडे पडतात. तुम्हाला केस सरळ करायचे असतील तर यासाठी नैसर्गिक पद्धतीचा वापर करु शकता.

२. मेसी बन
उन्हाळ्याच्या दिवसात मेसी बन हेअरस्टाइल मोठ्या प्रमाणात वापरली जाते. तरुणी स्वतःचा स्टायलिश लूक करण्यासाठी उन्हाळ्यात मेसी बन हेअर स्टाइलची निवड करतात. केस सैल सोडल्यानेही त्यांचे नुकसान होते, लक्षात घ्या. कॅज्युअल लूकसाठी मेसी बन ही उत्तम निवड नक्की असू शकते. मात्र या हेअर स्टाइलने तुमच्या केसांचे भरपूर नुकसान होते. तसेच केसगळती सुद्धा मोठ्या प्रमाणात होऊ शकते.

३. टाइट पोनीटेल
लांबसडक आणि छोट्या केसांसाठी सर्वात सोपी हेअरस्टाइल म्हणजे पोनीटेल. मात्र, या हेअर स्टाइलने केस खराब होतात. पोनीटेलने केस घट्ट बांधले जातात. त्यामुळे केसांच्या मुळांवर परिणाम झाल्याने ते कमकुवत होतात. आणि केसांचे तुटणे, केसगळती वाढते. रबर बँड मुळे केसांचे सर्वाधिक नुकसान होते.

४. मागील बाजूस केस ठेवणे
बहुतांश तरुणी केस घनदाट आणि लांबसडक दिसण्याकरता भांग न पाडता सर्व केस मागील बाजूस बांधतात. ही हेअरस्टाइल जरी आकर्षक असली तरी केसांच्या आरोग्यासाठी चांगली नाही. कारण यामुळे केसात गुंता होण्याचे प्रमाण वाढते. गुंता वाढल्याने केस तुटण्याची शक्यता आहे. केसांचे नुकसान टाळण्यासाठी ही हेअरस्टाइल करु नये. व केसांचा गुंता होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.

५. घट्ट वेणी
काही तरुणींचा घट्ट वेणी बांधल्याने केस मजबूत आणि लवकर वाढतात, असा समज असतो. मात्र, वास्तव्यात घट्ट वेणी बांधल्याने केसांचे नुकसान होते. ताण पडल्याने केस कमकुवत होतात. त्यामुळे केस तुटतात. तसेच केसांसाठी तुम्ही मोठ्या प्रमाणात पिन आणि क्लिपचा वापर करत असाल तर टाळूच्या त्वचेचंही नुकसान होण्याची भीती आहे. यामुळे डोकेदुखी, डोके जड झाल्यासारखे वाटणे इत्यादी समस्यां उद्भवू शकतात.