Hair Care Tips | केस कोरडे आणि निर्जीव होण्यापासून वाचवण्यासाठी अवलंबा ‘या’ 4 टिप्स; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Hair Care Tips | हिवाळा असो की उन्हाळा, केस सर्वप्रथम निर्जीव होतात. केस निरोगी ठेवण्यासाठी आणि गमावलेला ओलावा परत आणण्यासाठी लोक बाजारात उपलब्ध असलेल्या विविध केमिकलयुक्त प्रॉडक्टचा वापर करतात. त्यामुळे केसांना फायद्यापेक्षा नुकसान जास्त होते. जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स (Hair Care Tips) सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही केस कोरडे आणि निर्जीव होण्यापासून वाचवू शकता. (How To Protect Hair From Dryness)

 

1. ड्राय शॅम्पू (Dry Shampoo) –
अनेकांचा स्कॅल्प (Scalp) चिकट होतो. त्यामुळे रोज केस धुण्यास (Hair Wash) सुरुवात करतात. यामुळे केस आणखी फ्रिजी (Frizzy Hair) होऊ शकतात. जर तुम्हाला पार्टीला जायचे असेल आणि तुम्ही एक दिवस आधी तुमचे केस शॅम्पू केले असतील तर तुम्ही केस पुन्हा धुण्याऐवजी ड्राय शॅम्पू करू शकता. तो स्कॅल्पमधील अतिरिक्त तेल शोषण्यास मदत करते (Hair Care Tips).

 

2. कंडिशनरचा वापर (Use of Conditioner)
कोरड्या (Dry Hair) आणि फ्रिजी केसांपासून मुक्त होण्यासाठी केस धुतल्यानंतर कंडिशनर (Conditioner) वापरा. असे केल्याने तुमचे केस मॉयश्चराईझ (Moisturize) राहतात आणि केस विस्कटून तुटत नाहीत.

3. हिट स्टायलिंगपासून दूर रहा (Stay Away from Heat Styling)
हिट स्टायलिंगमुळे (Hit Styling) तुमचे केस खराब होऊ शकतात. जर तुम्हाला ते केसांवर वापरायचे असेल तर ते वापरण्यापूर्वी हिट प्रोटेक्शन स्प्रेचा (Hit Protection Spray) वापर करा. हा स्प्रे केसांना उष्णतेमुळे होणारे नुकसान टाळतो. तसेच कोरडे आणि फ्रिजी होण्यापासून वाचवतो.

 

4. ट्रिमिंग (Triming) –
दुतोंडी केसांमुळे (Split Ends) तुमच्या केसांचे नुकसान तर होतेच शिवाय वाढीवरही वाईट परिणाम होतो. चांगल्या वाढीसाठी आपले केस नियमितपणे ट्रिम (Hair Trim) करा.

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Care Tips | how to protect hair from dryness and hair care tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | चित्रपटाच्या नावाखाली निर्जनस्थळी नेऊन 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार ; न्युड फोटो, व्हिडिओ काढून बदनामी

 

Pune Crime | महिला बाऊन्सरला गुंगीचे औषध देऊन बलात्कार ; कात्रज परिसरातील हॉटेलमध्ये घडलेला प्रकार

 

Nandurbar Police | मद्यापान करुन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कारवाईसह परवाना रद्द, नंदुरबार पोलिसांची विशेष मोहीम