Hair Fall | गळणार्‍या आणि पातळ केसांमुळे होऊ नका त्रस्त, केवळ खोबरेल तेलात मिसळा या 2 वस्तू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आजकाल बहुतांश लोकांना केस गळणे (Hair Fall) आणि तुटणे या समस्येचा त्रास होतो. याचे एक कारण महणजे वाढते प्रदूषण, दैनंदिन जीवनशैली आणि खाण्याच्या अनहेल्दी सवयी असू शकतात. यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात. खोबरेल तेल (Coconut oil) तुम्हाला या सर्व समस्यांपासून मुक्त करू शकते, आणि केस निरोगी आणि चमकदार बनवते. खोबरेल तेल मिक्स करून डोक्याला लावल्याने केस गळण्याची आणि पातळ होण्याच्या समस्येवर मात कशी करता येते ते जाणून घेऊया (Benefits of Coconut Oil For Hair).

 

केस गळती थांबवण्यासाठी खोबरेल तेलात मिसळा या गोष्टी

1. जास्वंदीची फुले (Shoeblackplant flowers)
जास्वंदीचे (Shoeblackplant) फूल त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. हे तुमचे केस मजबूत बनवते. ते खोबरेल तेलात कसे मिसळायचे ते जाणून घेऊया. सर्व प्रथम, या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करा, नंतर त्या पाण्याने चांगल्या धुवा आणि कडक होईपर्यंत उन्हात वाळवा. त्यानंतर त्या चांगल्या कुस्करून खोबरेल तेलात मिसळा. नंतर तेलात पूर्णपणे मिसळेपर्यंत चांगल्या गरम करा. नंतर तेल थंड होईपर्यंत थांबा. त्यानंतर काचेच्या बाटलीत ठेवा. आठवड्यातून 4 वेळा केसांना चांगला मसाज करा. हे नैसर्गिकरित्या पांढरे केस काळे करण्यासाठी हे वापरता येऊ शकते.

2. कढीपत्ता (Curry Leaves)
कढीपत्ता केसांसाठी खूप फायदेशीर आहे. केस गळणे ही आता एक सामान्य समस्या बनली आहे. ही पाने तुमचे केस पातळ होण्यास प्रतिबंध करतात कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अमीनो अ‍ॅसिड असते. यामुळे केस मुळापासून मजबूत होतात. इतकेच नाही तर त्यात बीटा-कॅरोटीन आणि प्रोटीन देखील आढळतात, ज्यामुळे केसांची वाढ देखील चांगली होते. ते तेलात कसे मिसळायचे ते जाणून घेऊया. कढीपत्ता पाण्याने नीट धुवून उन्हात वाळवा नंतर खोबरेल तेलात मिसळून चांगला गरम करा. आता ते थंड झाल्यावर एका बाटलीत भरून घ्या, हे तेल आठवड्यातून 3 वेळा लावले तर अपेक्षित परिणाम मिळेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Fall | coconut oil for hair fall problem solution mix hibiscus flower and curry leaves for thinning

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Methi And Milk Benefits | मेथीदाणे आणि दूधाच्या सेवनाने शरीराला होतील हे 5 जबरदस्त फायदे, असा करा वापर

 

Cinnamon and lemon benefits | आरोग्यासाठी दालचीनी आणि लिंबूचे फायदे

 

Weird Food Combinations | पपई खाल्ल्यानंतर कधीही खाऊ नका या वस्तू, होऊ शकते जीवघेणे नुकसान