Hair Fall | ‘ही’ एक गोष्ट जास्त खाल्ल्याने वेगाने गळतात केस, खाण्या-पिण्यात बाळगा सावधगिरी; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केस गळणे (Hair Fall) ही एक सामान्य समस्या आहे जी बर्‍याचदा लोकांना त्रास देते. स्त्रिया आणि पुरुष दोघांमध्ये केस गळती वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येते. केस गळण्याची (Hair Fall) सर्वात सामान्य स्थिती म्हणजे एंड्रोजेनेटिक अलोपेसिया (Androgenetic Alopecia) ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये केस एकाच पॅटर्नमध्ये गळतात. हे सामान्यतः 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांमध्ये आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये दिसून येते.

 

मात्र, यामागे वय हा एकच घटक नसून खाण्याची एक अशी वस्तू आहे जी केसांवर परिणाम (Effects On Hair) करते, यामुळे केस गळतात (Hair Fall), असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे तरुणांमध्येही केस गळतीचा हा प्रकार पाहायला मिळत आहे.

 

तज्ज्ञ काय म्हणतात (What Experts Say) –
UK चे प्रसिद्ध ट्रायकोलॉजिस्ट केविन मूर (Trichologist Kevin Moore) म्हणतात की, अन्नामध्ये जास्त मीठ (Salt) नक्कीच तुमच्या केसांच्या आरोग्याला (Hair Health) खूप हानी पोहोचवते आणि यामुळे केस गळतात. British GQ ला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, जास्त मीठ खाल्ल्याने केसांच्या रोमांभोवती सोडियम (Sodium) तयार होते, ज्यामुळे हेअर फॉलिकलच्या (Hair follicles) रक्ताभिसरणावर परिणाम करते. यामुळे आवश्यक पोषकतत्व केसांच्या मुळांपर्यंत पोहचू शकत नाहीत.

 

मूर म्हणाले, जास्त प्रमाणात सोडियममुळे (Sodium) केस निर्जीव आणि कमकुवत होतात आणि हेच त्यांच्या गळतीचे कारण आहे. मात्र, खूप कमी सोडियम देखील केसांच्या वाढीमध्ये समस्या निर्माण करू शकते. खूप कमी मीठ खाल्ल्याने शरीरात आयोडीनची (Iodine) कमतरता निर्माण होते, जे थायरॉईडच्या (Thyroid) चांगल्या कार्यासाठी आवश्यक असते. ते म्हणाले, थायरॉईड असंतुलित असेल तर तुमच्या केसांवरही परिणाम होतो. यामुळे केस निर्जीव आणि पातळ होतात.

 

कसे मजबूत होतात केस (How To Strengthen Hair)
तज्ज्ञांच्या मते, केसांची ताकद तुमच्या आहारातील व्हिटॅमिन (Vitamin) आणि मिनरलवर (Mineral) अवलंबून असते. आयर्न आणि व्हिटॅमिन B5 (Vitamin B5) केस पातळ होण्यास प्रतिबंध करतात आणि स्काल्प (Scalp) निरोगी ठेवतात, तर केसांची मजबूती (Hair Strength) आणि चमक (Hair Shine) यासाठी प्रोटीन आवश्यक असतात. याशिवाय, पर्यावरणीय समस्यांमुळे (Environmental Problems) केसांचा दर्जा देखील खराब होतो, जे सामान्य आहे. काही लोकांमध्ये ही समस्या अनुवांशिक देखील आहे.

जास्त मीठ धोकादायक (Too Much Salt Is Bad)
मज्जातंतू आणि स्नायूंच्या योग्य कार्यासाठी शरीर मीठावर अवलंबून असते, परंतु ते जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तदाब (Blood Pressure) वाढवते.
यामुळे हार्ट अटॅक (Heart Attack) आणि स्ट्रोकचा (Stroke) धोका वाढतो. एनएचएसनुसार (NHS), प्रौढांनी दिवसातून 6 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

 

हे जवळपास एक चमचा आहे, ज्यामध्ये 2.4 ग्रॅम सोडियम असते.
स्वयंपाक करताना किंवा खाताना काळजी घेऊन तुम्ही मिठाचे सेवन ट्रॅक करू शकता.

 

या पदार्थांमध्ये असते जास्त मीठ (These foods contain a lot of salt)
काही खाद्यपदार्थांमध्ये आधीपासून मीठ असते जसे की टोमॅटो सॉस (Tomato Sauce), पॅकेज केलेले पदार्थ (Packaged Foods),
ब्रेड (Bread), रेडी टू इट्स फूड्स (Ready To Eat Foods), पिझ्झा (Pizza), सँडविच (Sandwich) आणि सूप (Soup)
ज्यामध्ये आधीपासून काही प्रमाणात मीठ असते. यासाठी अन्नपदार्थ खरेदी करताना पाहून घ्या.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Fall | hair loss common type androgenetic alopecia causes treatment sodium

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Narayan Rane | ‘…म्हणून शिवसेनेने गद्दारी केली’, नारायण राणेंचा सेनेवर जोरदार ‘प्रहार’

 

Nilesh Rane On Nawab Malik | ‘दाऊदचा फ्रंटमॅन नवाब मलिक असू शकतात’; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

 

Protein Rich Fruits | पोलादी बॉडीसाठी चिकन-अंडी नव्हे, खा ‘ही’ 5 स्वस्त फळे, शरीराला मिळेल पूर्ण प्रोटीन