Hair Fall Problems | ‘या; 5 गोष्टी खाल्ल्याने वाढते केस गळतीची समस्या; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – काळे घनदाट केस सर्वांनाच हवे असतात. अशा केसांमुळे शरीराचे सौंदर्य खुलते. मुलं असोत किंवा मुली सगळ्यांनाच काळे जाड केस हवे असतात. पण खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि प्रदूषित वातावरणामुळे केस गळण्याची समस्या (Hair Fall Problems) वाढत आहे. लहान वयातच लोकांचे केस गळायला लागतात. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये केस गळतीची समस्या अधिक आहे. बर्‍याच जणांना वयाआधी टक्कल पडते. केसगळतीमुळे त्रस्त असलेल्या महिलांपासून पुरुषांपर्यंत विविध प्रकारचे घरगुती उपचार, केसांचे तेल, शॅम्पू आणि प्रोडक्ट्स वापरतात, पण अनेक वेळा त्याचा उलटा परिणाम होतो (Causes Of Hair Loss). कोंडा, पातळ केस, टक्कल पडण्याच्या तक्रारी वाढू लागतात (Hair Fall Problems).

 

अशावेळी केस गळतीच्या समस्येने तुम्हीही त्रस्त असाल तर जेवणापासून सुरुवात करा. काही गोष्टींच्या सेवनामुळे केस गळणं (Hair Fall) जास्त होतं. नकळत लोक अशा पदार्थांचे सेवन करत राहतात. त्यामुळे केस गळू नये म्हणून त्या गोष्टींचं सेवन कमी केलं तर ते केसांसाठी घातक ठरू शकतं (Hair Fall Problems). जाणून घेऊया कोणत्या अन्न सेवनाने केस गळण्याची समस्या वाढते (Let’s Know Which Foods Increase The Risk Of Hair Fall).

 

या गोष्टींच्या सेवनाने केस गळतात (Consumption Of These Foods Causes Hair Fall) :
साखरेच्या अतिसेवनामुळे अनेक प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळत असते. साखर शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. एका अभ्यासानुसार मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिन प्रतिरोध निर्माण होतो, ज्यामुळे त्यांचे केस गळू लागतात. वजन जास्त असतानाही केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. त्यावर योग्य वेळी मात न केल्यास टक्कलही पडते. त्यामुळे साखरेचे सेवन कमीत कमी केले पाहिजे.

अल्कोहोल टाळा (Avoid Alcohol) :
अल्कोहोलचे सेवन कोणत्याही प्रकारे चांगले नाही. दारू प्यायल्याने मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारे हानी होते. अल्कोहोलचा आपल्या केसांवर देखील परिणाम होतो. खरं तर केस हे केराटिन नावाच्या प्रथिनापासून बनवले जातात. अल्कोहोलच्या सेवनाने प्रथिनांवर नकारात्मक परिणाम होतो आणि केस कमकुवत होऊन गळू लागतात.

 

कच्ची अंडी घातक (Raw Eggs Are Deadly) :
अंडे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, विशेषत: केसांसाठी, अंडी खूप उपयुक्त मानली जातात. परंतु ती वापरण्याची एक योग्य पद्धत आहे. कच्च्या अंड्यांचं सेवन करणं केसांसाठी घातक ठरू शकतं. कच्च्या अंड्याच्या पांढर्‍या भागाचे सेवन केल्याने बायोटिनची कमतरता निर्माण होते. बायोटिन केराटिन तयार करण्यास मदत करते, जे प्रथिने म्हणून कार्य करते. अशा परिस्थितीत कच्चे अंडे खाण्यापेक्षा शिजवलेले अंडे खावे.

 

जंक फूड (Junk Food) :
आजकाल लहान मुलांपासून तरुणांपर्यंत जंक फूडचं सेवन वाढलं आहे. जंक फूड आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
जंक फूडमध्ये सॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आढळतात.
ज्यामुळे लठ्ठपणा वाढण्याबरोबरच हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. केस गळण्याचीही समस्या आहे.
मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने टाळूला वंगण येते. यामुळे छिद्र लहान होऊ शकतात आणि केस गळण्याची समस्या वाढू शकते.

मासे (Fish) :
मासे खाण्यामुळे केस गळण्याची समस्याही वाढू शकते. माशांमध्ये पार्‍याची पातळी खूप जास्त असते.
त्याच्या सेवनाने केस गळतात. त्यामुळे केस गळण्याचा त्रास होत असेल तर माशांचं सेवन कमी करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Hair Fall Problems | hair fall problems can increase by eating these 5 things

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Summer Health Tips | जाणून घ्या उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव होण्याची कारणे, परिणाम आणि प्रतिबंध उपाय

 

Bad Habits For Ear Health | ‘या’ 4 सवयींमुळे तुमच्या ऐकण्याच्या क्षमतेवर होऊ शकतो परिणाम; ‘या’ पध्दतीच्या चूका करण्यासाठी राहा दूर, जाणून घ्या

 

Symptoms Of Heart Attack | हार्ट अटॅकच्या आधी शरीरात ‘या’ पध्दतीच्या समस्या उद्भवतात; ‘या’ लक्षांवर लक्ष ठेवून करू शकतो बचाव, जाणून घ्या