केस गळतात मग फक्त ‘या’ 5 गोष्टींचा समावेश जेवणात करा, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – औषध किंवा तेलही नाही. आपल्या गळणाऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी, आहारात बदल करणे महत्वाचे आहे. केस गळणे थेट आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. आपले आरोग्य ढासळताच केस गळण्यास सुरवात होते, अशा परिस्थितीत आपण आपले गळणारे केस थांबवू इच्छित असाल तर आपल्या आहारात हे आवश्यक बदल करा.

१) अंडी :
बायोटिन आणि जीवनसत्त्वे यांनी समृध्द असलेले अंडे केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी चांगले असते. अंडी खाण्याशिवाय हे ऑलिव्ह ऑईलमध्ये मिसळून केसांना लावू शकता. २ अंडी घ्या त्यामध्ये 4 चमचे ऑलिव्ह ऑइल मिसळा. पातळ पेस्ट बनवून डोक्यावर लावा. केस गळती कमी होईल.

२) पालक :
पालक, लोह आणि फॉलेटचा एक चांगला स्त्रोत आहे, केसांच्या वाढीसाठी पालक उपयुक्त ठरतो. यासह, फॉलेट केसांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते. पालकाची कोशिंबीर आहारात समाविष्ट करून घेऊ शकता

३) शिमला मिरची :
लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगात आढळणार्‍या कॅप्सिकममध्ये केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे लाल रक्तपेशींमध्ये पुरेसे लोह आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. व्हिटॅमिन सीच्या अभावामुळे केस कोरडे होतात आणि त्वरीत गळायला लागतात.

४) मसूर डाळ :
टोफू, सोयाबीन, स्टार्चयुक्त बीन्स आणि मटार हे शाकाहारी लोकांसाठी लोह आणि प्रथिने यांचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आहेत. हे सर्व पदार्थ केसांच्या वाढीसाठी खूप महत्वाचे आहेत.

५) रताळी :
केसांच्या वाढीसाठी भरपूर व्हिटॅमिन आणि बीटा कॅरोटीन उत्तम आहे. रताळ्यांमध्ये भरपूर व्हिटॅमिन आणि बीटा कॅरोटीन असते. बीटा कॅरोटीनचे इतर स्त्रोत म्हणजे गाजर आणि भोपळा यांचाही आहारात समावेश केल्यामुळे केस गळती थांबते.