जाणून घ्या केसांना मेहंदी लावण्याचे ‘हे’ 8 फायदे !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेकांना केसांना कलर करायला खूप आवडतं. परंतु केमिकल्सचा मारा नको म्हणून काही लोक याला पर्याय म्हणून मेहंदी केसांना लावण्याचा पर्याय निवडतात. यातही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे काळी मेहंदी आणि एक लाल मेहंदी. तसं पाहिलं तर दोन्हीही प्रकारच्या मेहंदीचा आपल्याला फायदा होतो. मुळात केसांना मेहंदी लावण्याचे कोणते फायदे होतात याची माहिती आपण घेणार आहोत.

केसांना मेहंदी लावण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –

1) पांढऱ्या केसांना नवीन रंग येतो. काळी मेहंदी लावली तर केस नैसर्गिकरित्या काळे असल्यासारखे वाटतात.

2) केसांच्या आरोग्यात सुधारणा होते.

3) केसांना चकाकी येते.

4) केसांचा पोत सुधारतो आणि ते मऊ होतात.

5) केस अकाली पांढरे होण्याचं प्रमाण कमी होतं.

6) कोंडा होण्याची समस्या दूर होते.

Advt.

7) केसांची वाढ होण्यास आणखी मदत होते.

8) नैसर्गिकरित्या तयार करण्यात आल्यानं यामुळं केसांचं नुकसान होत नाही.

9) डोकं शांत राहतं.

कुणी मेहंदीचा वापर करणं टाळावं ?

1) सतत डोकेदुखीनं त्रस्त असणाऱ्यांनी मेहंदी लावू नये.

2) सर्दी, पडसं, ताप या समस्या असणाऱ्यांनी मेहंदी लावू नये.

3) लहान मुलांनी याचा वापर करू नये.

4) मेहंदी महिन्यातून एक किंवा दोन वेळाच लावावी.

टीप –  वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.