पावसाळ्यात ‘अशी’ दूर करा कोंडा, केसगळती आणि केसांच्या चिकटपणाची समस्या ! वापरा ‘हे’ 4 सोपे घरगुती ‘हेअर मास्क’

पोलीसनामा ऑनलाईन – पावसाळ्यात त्वचा, केस आणि आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. अनेक महिला केसगळती, कोंडा आणि केसांच्या चिकटपणानं त्रस्त असतात. यासाठी काही खास हेअर मास्क तुम्ही लावू शकता. आज यासाठी काही घरगुती हेअर मास्कची माहिती घेऊयात.

1) कोरफड आणि कडुलिंब हेअर मास्क – यासाठी पुढीलप्रमाणं कृती करा.

– कोरफड 30 मिनिटांसाठी पाण्यात भिजवा.
– आता यातील गर काढा
– कडुलिंबाची पानं वाटून घ्या.
– कोरफडीचा गर आणि ही पानं एकत्र करा.
– तयार मिश्रण आता केसांना मुळापासून लावा.
– आता माईल्ड शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ करा.
– यानं केसांचा चिकटपणा दूर होऊन केसांचं आरोग्य चांगलं राहतं.

2) खोबरेल तेल आणि दही हेअर मास्क – यासाठी पुढीलप्रमाणं कृती करा.

– अर्धा कप दही घ्या
– यात 5 चमचे खोबरेल तेल एकत्र करा
– यात 5 थेंब लिंबाचा रस टाका
– हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा.
– अर्ध्या तासानं केस स्वच्छ धुवून घ्या.
– यामुळं कोंडा दूर होतो आणि केसांची चमक वाढते.

3) अवोकाडो आणि केळी हेअर मास्क – यासाठी पुढीलप्रमाणं कृती करा.

– अवोकाडोची साल काढून घ्या.
– याच्या आतील भाग एका बाऊलमध्ये काढा
– यात साल काढलेली केळी स्मॅश करून टाका.
– आता यात 2 चमचे मध टाका.
– हे मिश्रण नीट एकत्र करून पेस्ट तयार करा.
– आता ब्रशच्या मदतीनं हे मिश्रण नीट केसांना मुळापासून लावा.
– यामुळं हेअरफॉलची समस्या कमी होते आणि केस मजबूत होतात.

4) आवळा आणि कडुलिंब हेअर मास्क – यासाठी पुढीलप्रमाणं कृती करा.

– आवळा पाण्यात उकळून घ्या.
– यात कडुलिंबाची पानं वाटून घाला.
– आता तयार पेस्ट किंवा मिश्रण केसांना नीट लावा
– 20 ते 30 मिनिटे ठेवल्यानंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या.
– आठवड्यातून तीन वेळा हा मास्क केसांना लावा.
– यानं केसांची चमक वाढून केस मजबूत होतात.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ टाळावेत.