Post_Banner_Top

हेअरस्टाईलिस्ट जावेद हबीब भाजपात अन् सोशल मीडियावर भन्नाट मिम्स व्हायरल..

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रसिद्ध हेअरस्टाईल डिझायनर जावेद हबीब यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपा नेत्यांमध्ये काय बदल होणार हे सोशल मीडियावर मिम्समधून दर्शविण्यात येत आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच योगी आदित्यनाथ यांचे मिम्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध हेअरस्टाईल डिझायनर जावेद हबीब यांनी आधी मी फक्त केसांचा चौकीदार होतो, आता देशाचा चौकीदार झालो आहे असे म्हणत सोमवारी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या भाजपा प्रवेशावेळेसचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. जावेद हबीब यांच्या भाजपा प्रवेशानंतर नेटीझन्सनी भाजपाला चांगलेच ट्रोल केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच योगी आदित्यनाथ यांसारख्या अनेक नेत्यांच्या फोटोला एडीट करून त्यांच्या केसांची स्टाईल बदलली आहे. इतकेच नव्हे तर, भाजपा विरोधी नेते अभिनेते यांची देखील हेअरस्टाईल बदलली आहे. तसेच हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोण आहेत जावेद हबीब ?

जावेद हबीब देशाचे प्रसिद्ध हेअरस्टाईल डिझायनर आहेत. त्यांचे वडील पंडित नेहरू आणि इंदिरा गांधींची हेअरस्टाइल करत होते. जावेद हबीब यांचे २४ राज्यातील ११० शहरांमध्ये ८४६ सलून आहेत. विशेष म्हणजे, त्यांचे नुकतेच ‘हेअर योगा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Loading...
You might also like