Haiti Earthquake | ‘हैती’त भूकंपाचं तीव्र पडसाद, अनेक इमारती जमीनदोस्त तर आतापर्यंत 1297 जणांचा मृत्यू

लेस कायेस : वृत्तसंस्था – Haiti Earthquake | हैती या देशात शनिवारी (१४ ऑगस्ट) रोजी तीव्र भूकंप (Haiti Earthquake) झाला आहे. या भयानक झालेल्या भूकंपात शहरातील अनेक ठिकाणची प्रचंड हानी झाली आहे. शहरातील अनेक मोठ्या इमारती कोसळल्या आहेत. या हैतीमध्ये झालेल्या शक्तिशाली भूंकपात आतापर्यंत 1297 नागरिकांचा प्राण गेल्याची धक्कादायक माहिती मिळते. तर अनेक लोक गंभीर जखमी (Injured) आहेत. दरम्यान बळींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. कारण अनेक नागरिक त्या भुंकपात बेपत्ता आहेत. हा भुंकप 7.2 तीव्र स्वरूपाचा झाला आहे.

या आधीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने नागरिकांना हतबल करून टाकलं आहे. त्यातच कॅरिबियन देश असणाऱ्या हैतीत (Haiti) भूकंपामुळे (Earthquake) परिस्थिती आणखी बिकट झाली. हैती या देशात झालेल्या भयावह तीव्र भूंकपात (Earthquake) सर्वाधिक जीवितहानी देशाच्या दक्षिण भागात झालीय. दोन दिवस अनेक शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तसेच दरडी कोसळल्याने लोकांचा बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या अडचणी समोर येतात.

दरम्यान, पुढील आठवड्याच्या येथील संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण सोमवारी
अथवा मंगळवारी हैतीत (Haiti) ग्रेस चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता आहे. भूकंपाचा
(Earthquake) केंद्रबिंदू राजधानी पोर्ट औ प्रिन्सपासून (Capital Port au Prince) सुमारे
125 किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती यूएसचे भूवैज्ञानिकांनी दिलीय. हैतीच्या पंतप्रधानांनी
देशभरात एक महिन्यासाठी आणीबाणी घोषीत केलीय. त्याचबरोबर नुकसानीचा संपूर्ण तपशील समोर आल्याशिवाय आंतरराष्ट्रीय मदत घेणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर काही शहरे पूर्णपणे उद्धवस्त देखील झालीत. असं सांगितलं आहे.

या पार्श्वभूमीवर हैतीचे पंतप्रधान पुढे (Prime Minister of Haiti) म्हणाले की, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉसकडून भूकंपग्रस्त परिसरातील रुग्णालयात जखमींची काळजी घेतली जाते. त्याचबरोबर हैतीतील नागरिकांना संकट काळात एकत्र येण्याचं आवाहन केलं. आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची कमतरता आहे. जखमींची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी अन्नासह तात्पुरता निवारा आणि मानसिक आधाराची नागरिकांची आवश्यकता आहे.

हे देखील वाचा

PM Kisan | शेतकर्‍यांच्या अकाऊंटमध्ये 2000 रुपयांऐवजी येतील 4000 रुपये! सरकार वाढवणार आहे योजनेची रक्कम?

Vinayak Raut | ‘नारायण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही’


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Haiti Earthquake | 1297 died in haiti earthquake more than 2800 injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update