Haj Yatra | हज यात्रेत घडला इतिहास, मक्केत पहिल्यांदाच महिला रक्षक तैनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधुनिक काळात देखील महिलांवर अनेक बंधने आहेत. खासकरून मुस्लीम राष्ट्रांमध्ये (Islamic Country) महिलांवर सर्वाधिक बंधने आहे. मात्र आता या देशांमध्ये देखील बदलाव येताना पाहयला मिळत आहे. याचे एक उदाहरण हज यात्रेदरम्यान (Haj Yatra) पहायला मिळालं. हज यात्रेदरम्यान (Haj Yatra) मक्केत चक्क एक महिलेला सुरक्षा रक्षक म्हणून तैनात करण्यात आले होते. हे पहिल्यांदाच घडले आहे. या महिला सुरक्षा रक्षकाचे (Woman Security Guard In Mecca) नाव मोना असं आहे.

इस्लाम धर्माचं जन्मस्थान असलेल्या सौदी अरोबियातील (Saudi Arabia) मक्का हे ठिकाण जगभरातील मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी हज यात्रा भरते. यात्रेसाठी जगभरातून लाखो भावीक याठिकाणी येत असतात. भावीकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षरक्षकांची नेमणूक केली जाते. यावेळी पहिल्यांदाच महिलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मोना नावाच्या महिलेचा समावेश आहे. धर्माची, देशाची आणि अल्लाहच्या भक्तांची सेवा करणं ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे मोना सांगते.

 

मोना मानसशास्त्राची विद्यार्थीनी

मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या मोनाने आपल्या वडिलांच्या कारकीर्दीमुळे सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. ती सौदीतल्या पहिल्या महिला सैन्य तुकडीत सामील झाली. एप्रिलपासून मक्का आणि मदीना (Mecca and Medina) या तीर्थस्थळी येणाऱ्या भावीकांच्या संरक्षणासाठी मोठ्या प्रमणात महिला सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये तिचा समावेश आहे. मोना मक्का येथील ग्रँड मशिदीतल्या (Grand Masque) सुरक्षा व्यवस्थेचा भाग आहे. याठीकाणी येणाऱ्या हज यात्रेकरुंना सर्व सुविधा मिळतील याची जबाबदारी मोनाकडे (Mona) आहे.

सौदी अरेबियात ‘व्हिजन 2030’
सौदी अरेबियामध्ये पारंपारिक कायद्यांमध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत. या ठिकाणी महिलांवर अनेक बंधने होती. मात्र आता ही बंधने कमी करण्यात आली आहेत. पूर्वी महिलांसाठी बंदी असलेली अनेक क्षेत्रं खुली करण्यात आली आहेत. याचेच हे एक उदाहरण आहे. सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे सौदीमधील अनेक सामाजिक आणि आर्थिक सुधारणांवर भर दिला जात आहे. या सुधार प्रक्रियेला ‘व्हिजन 2030’ असे नाव देण्यात आले आहे. त्याअंतर्गत महिलांवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत.

महिला कौटुंबीक निर्णय घेऊ शकतात
सौदी अरेबियात महिलांवरील निर्बंध हटवण्यात आल्याने प्रौढ महिला कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय कुठेही जाऊ शकतात.
तसेच कौटुंबिक प्रकरणात निर्णय घेण्याचा अधिकार महिलांना देण्यात आला आहे.
मुस्लीम राष्ट्रांमध्ये महिलांवर असलेले निर्बंध कमी केले जात असल्याने हे सुखद आहे.
यामुळे महिलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे राहता येणार आहे. त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करता येणार आहेत.

Web Title :- Haj Yatra | a first time women soldiers stand guard in mecca during haj

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे