‘कोरोना’ व्हायरसच्या महामारीत सौदी अरबमध्ये सुरू झाली हज यात्रा, पहायला मिळाले वेगळेच द़ृश्य

दुबई : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसच्या काळात सौदी अरबमध्ये सुरू झालेल्या हज यात्रेत वेगळेच दृश्य पहायला मिळत आहे. लोकांनी चेहर्‍यावर मास्क लावले होते आणि ते आयसोलेशननंतर छोट्या समुहात येत होते. येथे खुप कमी लोकांना हजची परवानगी दिली आहे. परदेशी नागरिक जे अगोदरचे सौदीत होते अशांनाच हजची परवानगी मिळाली आहे.

ज्या लोकांना यावर्षी परवानगी मिळाली आहे, त्यांची मागच्या आठवड्यात मक्कामध्ये पोहचल्यानंतर तपासणी करण्यात आली आणि तापमान सुद्धा तपासण्यात आले. यात्रेकरूंना हजयात्रेपूर्वी आणि नंतर सक्तीने क्वारंटाईनमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

देशाच्या धार्मिक प्रकरणांचे मंत्री मोहम्मद सालेह यांनी म्हटले की, येथे येणारे लोक आपल्या घरांमध्ये क्वारंटाइन होते, तर यानंतर त्यांना मक्काच्या हॉटेल्समध्ये चार दिवसांपर्यंत क्वारंटाइन राहावे लागेल. जे लोक वर्षी हजमध्ये सहभागी होत आहेत, त्यांच्यामध्ये 30 टक्के सौदी अरबचे नागरिक आहेत आणि अन्य लोक सौदीमध्ये राहात असलेले परदेशी नागरिक आहेत.