लॉकडाऊन व रमजानच्या काळात हाजी तौसिफ शेख यांच्याकडून गरजूंना मदतीचा ‘हात’; शेकडोंना केली आर्थिक मदत, रुग्णांना केले सहाय्य व पोलिसांना दिले 500 मास्क वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन ( बासित शेख ) –   कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये लाखो लोकांचे कामधंदे बंद पडले होते. यावेळी हजारो गोरगरीबांच्या हाताला काम नाही, पोटात अन्नाचा कण नाही, अशा वेळी मीम इत्तेहाद सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हाजी तौसिफ शेख यांनी ५ हजाराहून अधिक लोकांना धान्य वाटप केले. इतकेच नाही तर १५० जणांना रोजगार मिळवून दिला होता.

कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेच्या वेळी पुन्हा एकदा लॉकडाऊन आला. त्यात पवित्र रमजान महिना आला. या वेळी पुन्हा एकदा हाजी तौसिफ शेख हे गोरगरीबांच्या मदतीला पुढे सरसावले. यावेळी कोंढाव्या करांना 2000 अन्न धान्य किट व कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नव्हते. बेड मिळाला तर उपचारासाठी रुग्णालयातून अगोदर डिपॉझिट भरण्यास सांगितले जात होते. अशावेळी हाजी तौसिक शेख हे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीला धावून आले. त्यांनी गरजू लोकांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करुन देण्यासाठी धावाधाव केली. जेथे लोकांना डिपॉझिट भरायला पैसे नव्हते, त्यांना आर्थिक मदत करुन रुग्णांवर उपचार होतील, याकडे लक्ष दिले. कोंढव्यातील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची पुर्तता करुन देण्यासाठी त्यांनी धडपड केली. रुग्णांना लागणारे औषधोपचाराचा खर्च व रेमडेसिवीर इंजेक्शन व लसीकरणाची व्यवस्था करुन दिली. त्यातून अनेकांना वेळेवर उपचार मिळाल्याने ते कोरोनाच्या मगरमिठीतून सुखरुप बाहेर येऊ शकले आहेत.

दरम्यान हाजी तौसिफ यांनी पोलिसांसाठी महाराष्ट्र पोलीस बोध चिन्ह असलेले 500 मस्कचे वाटप पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व परिमंडळ 5 चे उपयुक्त नम्रता पाटील यांचे हस्ते केले.

हाजी तौसिफ शेख यांनी कोंढवा परिसरातील गरजूंना रमजानच्या इफ्तारसाठी फळे वाटप केले. शेतकर्‍यांकडून भाजीपाला, फळे विकत घेऊन ती लोकांपर्यंत पोहचली. त्यामुळे गरीब मुस्लिम बांधवांना रोजा सोडण्यास मोठी मदत झाली.

याबाबत हाजी तौसिफ शेख यांनी पोलिसनामाला सांगितले की, पवित्र रमजानच्या महिन्यात जकात अदा करण्याची पद्धत आहे. लॉकडाऊनमुळे गरजू गरीब लोकांना मदत करण्याची संधी मला मिळाली. अल्लाने माझ्याकडून लोकांची ही सेवा करवून घेतली आहे. लोकांनी घरात बसूनच आपल्या कुटुंबियांसमवेत ईद साजरी करावी, असे आवाहन तौसिफ शेख यांनी केले आहे.

ईद मुबारक