Hajj Pilgrims Vaccination In Pune | 1400 हज यात्रेकरुंचे करण्यात आले लसीकरण; खुद्दामे हुज्जाज हज कमिटी यांनी आजम कॅम्पसमधील शिबीरात यात्रेविषयी केले मार्गदर्शन

Hajj Pilgrims Vaccination In Pune

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – (Haji Basit Shaikh) हज यात्रा लवकरच सुरु होत आहे. त्यादृष्टीने हज यात्रेला जाणार्‍या पुणे शहरातील सुमारे १४०० यात्रेकरुंचे शनिवारी युनानी मेडीकल आजम कॅम्पसमध्ये लसीकरण करण्यात आले. (Hajj Pilgrims Vaccination In Pune)

सौदी अरेबिया मधील हज येथे जगभरातून लाखो भाविक येत असतात. अशावेळी कोणतीही साथ पसरु नये, यासाठी यात्रेला येणार्‍या भाविकांना लसीकरण अत्यावश्यक करण्यात आले आहे. गेल्या ३० वर्षांपासून पुण्यात त्यासाठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येते. आजम कॅम्पसमध्ये शनिवारी या आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराला पुणे महापालिकेने सर्व वैद्यकीय मदत केली होती. महापालिकेचे विविध रुग्णालयातील ८ वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, नर्सिंग ऑर्डली, सफाई सेवक असा ५० जणांचे पथकाने हे लसीकरण केले.

Hajj Pilgrims Vaccination In Pune

पुण्यातून जवळपास १६०० भाविक हज यात्रेला जाणार आहेत. त्यापैकी जवळपास १४०० जणांचे लसीकरण या शिबीरात करण्यात आले. सर्व यात्रेकरुंचे मेंदूज्वर, ओरल पोलिओ व इन्फ्लूएंन्झा लसीकरण करण्यात आले.

लसीकरणाबरोबर यात्रेकरुंना हजला जाताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी. कोणत्या गोष्टी बरोबर ठेवाव्यात. तसेच ही यात्रा कशी राहणार आहे. तेथील मुक्काम व अन्य सोयीसुविधा याची माहिती देण्यात आली. लसीकरण देणारे सर्व वैद्यकीय अधिकारी यांना चहा, नाश्ता, दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी खुद्दामे हुज्जाज हज कमिटी चे अध्यक्ष हाजी रियाज काझी, हाजी मन्सूर, हाजी सत्तार चाचा , हाजी सईद खान, हाजी महेबुब भाई, हाजी बासीत शेख, हाजी अजीज भाई उर्फ मुज्जू , मुन्ना भाई सरफराज भाई, आसिफ भाऊ, आरिफ भाई, सफवान , अरकान, आसिफ शेख , अजीज भाई, हाजी अरमान या सर्वांनी मिळून हज यात्रे करुणा गेली 4 महिने पासून पेन्शनवाला मस्जिद येथे दर शनिवार रविवार तीन तास हज कसा करावे , यात्रे दरम्यान येणारे समस्या व त्याचा निवारण कसा करता येईल या सर्व सोयसुविधाची माहिती दिली मक्का व मदिना हज उमरा करण्याची माहिती मुफ्ती मौलवी यांनी दिली .

Total
0
Shares
Related Posts