मोदी सरकारचं मोठं पाऊल ! हज यात्रे दरम्यान ‘ही’ सुविधा देणारा भारत बनला पहिला देश, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2020 मध्ये हजला भेट देणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता हज यात्रेकरूंना सर्व लहान-सहान गोष्टींकरिता भटकंती करावी लागणार नाही. दिल्ली विमानतळ ते मक्का-मदीना अशी माहिती मोबाइलवरच मिळेल. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ई-मसीहा, हज मोबाइल अ‍ॅप आणि हज पोर्टलच्या माध्यमातून शक्य होणार आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी असा दावा केला आहे की हज यात्रेला 100 टक्के डिजिटलायझेशनशी जोडणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे.

यात्रेकरूंच्या मोबाईलवर मिळेल माहिती
आपण घर सोडताच हज यात्रा सुरू होते. प्रवासी आपल्या हज २०२० यात्रेला निघताच प्रथम त्याच्या मोबाइलवर माहिती येईल. त्याचे उड्डाण दिल्ली विमानतळावरून कोणत्या टर्मिनलवरून किती वाजता आहे, यासह ई-लगेज टॅगिंगची सुविधा कुठे उपलब्ध होईल, मक्का विमानतळावर उतरल्यानंतर कोणत्या क्रमांकाची बस सापडेल, जेथे राहणार त्या इमारतीचे नाव आणि खोली क्रमांक काय असेल, हजची विधी कधी व केव्हा पूर्ण करण्यास सांगितले जाईल, ही माहिती मोबाइलवर येईल. यासाठी मक्केमधील प्रवाशांना मिळणाऱ्या सिम अ‍ॅपशी जोडले जाईल.

मक्का-मदिनामधील सर्वोच्च तंत्रज्ञानाची सुविधा हज यात्रेकरूंनाही मिळणार आहे, यासाठी सौदी अरेबिया सरकारशीही चर्चा झाली आहे. 1 डिसेंबर 2019 रोजी अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी सौदी अरेबियाचे हजमंत्री डॉ. मुहम्मद सालेह बिन ताहार बेन्टेन यांच्यासह भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान हज 2020 या द्विपक्षीय करारावर स्वाक्षरी केली. त्याचप्रमाणे हज यात्रेकरूंना भारतात जाण्यापूर्वी सुविधांचा लाभ घेण्यास अडचण उद्भवू नये या उद्देशाने १०० टेलिफोन लाइनचे सूचना केंद्र सुरू केले आहे. हज हाऊसमध्ये प्रथमच अशी सुविधा सुरू करण्यात आली आहे .

 ई-मसिहाद्वारे केले जातील उपचार
हजवर जाण्यापूर्वी हज यात्रेकरूंना आरोग्य कार्ड दिले जाते. परंतु मक्का-मदिनामध्ये हज यात्रेकरूंना अडचण येऊ नये म्हणून ई-मसीहाच्या नावे ऑनलाईन सुविधासुद्धा सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत हज यात्रेकरूंच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही हज यात्रेकरूंना तत्काळ वैद्यकीय सेवा दिली जाऊ शकते. जेव्हाही हज यात्रेकरूंना वैद्यकीय सुविधेची गरज भासते, तेव्हा ते ऑनलाइन मागणी करू शकतील.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like