रणवीरच्या घरी पार पडला हळदी समारंभ

मुंबई : वृत्तसंस्था – बॉलिवूडमधल्या बहुचर्चित दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी  विवाहबंधनात अडकणार आहे.त्यादृष्टीने या दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली झाली आहे.
काही दिवसांपूर्वी दीपिकाने नंदी पुजा करत हे शुभकार्य निर्विघ्न पार पडण्याची प्रार्थना केली. आता रणवीर सिंगच्या घरी हळदीचा कार्यक्रम रंगला आहे. रविवारी रणवीरच्या वांद्रे येथील निवासस्थानी त्याचा हळदी समारंभ पार पडला. यावेळी त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. त्‍याचे गाल हळदीने माखलेले दिसत आहेत. यात त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे.  रणवीरचा उत्‍साह या फोटोंमध्‍ये पाहण्‍यासारखा आहे.
सध्या या समारंभातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून रणवीर या समारंभाचा पूरेपुर आनंद घेताना दिसत आहे.
 या कार्यक्रमात रणवीरच्या जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. तसेच यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शनि शर्मा यांचीही विशेष उपस्थिती होती. या सांरभचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’सारख्या चित्रपटात दीपिका आणि रणवीरने एकत्र काम केले आहे. हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
रणवीर दीपिकाचे शुभमंगल १४-१५ नोव्हेंबरला होणार असून हा विवाह सोहळा इटलीत रंगणार आहे.दरम्यान, रणवीर-दीपिकाचं लग्न सिंधी आणि कोंकणी अशा दोन्ही पद्धतींनी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सिंधी रितीप्रमाणे रणवीर- दीपिकाच्या लग्नातील सोहळे रंगणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us