अर्धा लीटर दूध घेणे पडणार महागात, ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्हाला लवकरच अर्धा लीटर दुधाचे पाकिट खरेदी करण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. अर्धा लीटर दुधाच्या पिशवीची किंमत वाढणार असून एक लीटर दूध जुन्याच दराने मिळणार आहे. केंद्र सरकारने देशभरातील सर्व दूध डेअरींना असे करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने एकदाच वापरलेले प्लॅस्टिक कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

अर्धा लीटर दुधाच्या पिशव्यांचे उत्पादन कमी होणार
साधारण कुटुंब छोटे असल्याने अर्धा लीटरच्या पिशव्यांमधून दूध घेतले जाते. मात्र, हे प्लॅस्टिक एकादाच वापरले जात असल्याने प्लॅस्टिक कचरा वाढत चालल्याने प्रमुख दूध उत्पादक संघांना अर्धा लीटर दुधाच्या पिशव्यांचे उत्पादन कमी करण्यास सांगितले आहे. याबरोबरच एक लीटर दूधाच्या पिशव्यांचा दुसऱ्यांदा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एक लीटरची पिशवी परत दिल्यास ग्राहकास सूट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अर्धा लीटर पिशवीची किंमत वाढणार
दुधाशिवाय दही आणि दुग्धजन्य उत्पादनांसाठी प्लॅस्टिक वापरले जाते. यासाठी वापरण्यात येणारे प्लॅस्टिक एकदाच वापरता येत असल्याने याचा वापर कमी करण्यास सांगण्यात आले आहे. अर्धा लीटर दुधाच्या पिशवीच्या किंमतीत वाढ केल्याने लोक ही पिशवी खरेदी करणार नाहीत. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर कमी होईल अशी आशा सरकारला आहे. त्यामुळे अर्ध्या लीटर पिशवीची किंमत वाढवण्यात येणार आहे.

देशात दररोज २० हजार टन प्लॅस्टिकचा कचरा तयार होतो. यापैकी केवळ १४ हजार टन कचरा जमा होतो. शिल्लक राहिलेल्या कचऱ्यामुळे पर्य़ावरणावर परिणाम होत आहे. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा वापरता येणारे प्लॅस्टिक लोकांनी कमी वापरावे असे आवाहन केले होते.

आरोग्यविषयक वृत्त –