‘रोटरी क्लब ऑफ निगडी – पुणे’ कडून ‘हाफ मॅरेथॉन’चं आयोजन ! ‘असं’ करा रजिस्ट्रेशन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात सेवा करणाऱ्या रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे तर्फे हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. गेल्या 10 वर्षांपासून या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. यंदा 8 डिसेंबर रोजी ही स्पर्धा होणार आहे. रोटरी क्लब ऑफ निगडी, पुणेचे अध्यक्ष विजय काळभोर यांनी याबाबत माहिती दिली आहे. 8 डिसेंबर रोजी सकाळी 5.30 मिनिटांनी सुरू होणाऱ्या या स्पर्धेचं आयोजन सिटी प्राईड स्कुलच्या मैदानात केलं गेलं आहे. यात पुरुष आणि महिला अशा दोघांचाही समावेश असणार आहे.

21,10,5 आणि 2 किमी असणार स्पर्धा-

या स्पर्धेत 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 2 किमी अशा अंतरांचा समावेश असणार आहे. या स्पर्धेत जे लोक सहभागी होणार आहेत त्यांना संस्थेकडून टी शर्ट, मेडल, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. याशिवाय स्पर्धकांसाठी नाष्ट्याचीही सुविधा असणार आहे. 5 किमी आणि 2 किमी अंतराची मॅरेथॉन कॉर्पोरेट कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केली आहे. लोकांमध्ये स्पोर्टला घेऊन जनजागृती करणं आणि उत्साह निर्माण करणं असा या मॅरेथॉनचा उद्देश आहे.

बक्षिस – या स्पर्धेनंतर प्रत्येक कॅटेगरीत 3 विजेता घोषित केले जाणार आहेत. 21 किमी मॅरेथॉनच्या पहिल्या क्रमांकासाठी 25 हजारांचं बक्षिस, दुसऱ्या क्रमांकासाठी 15 आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 10 हजारांचं बक्षिस ठेवण्यात आलं आहे. एकूण बक्षिसाची रक्कम 4 लाख रुपये आहे.

‘असं’ करा रजिस्ट्रेशन

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे. यासाठी तुम्हाला www.runathon.org.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल. अधिक माहितीसाठी तुम्ही 9890505194 या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता.

Visit : Policenama.com