सांगली : भाच्यावर चाकूहल्ला, मामाला शिक्षा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – जानराववाडी (ता. मिरज) येथे किरकोळ वादातून भाच्यावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी मामाला अकरा महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली. संभाजी चंदर नाईक (वय 35, जानराववाडी, मिरज) असे शिक्षा झालेल्या मामाचे नाव आहे. जिल्हा न्यायाधीश श्री. पेरमपल्ली यांनी ही शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. अनिल कुलकर्णी यांनी काम पाहिले. सदरची घटना फेब्रुवारी 2015 मध्ये घडली होती.
रवींद्र (वय 24) आणि लखन तम्माण्णा सुंगारे (वय 22) ही भावंडे शेतातच राहतात. तेथेच त्यांचा मामा नाईक रहात होता. नाईकच्या शेतातील गहू काढणीचे काम भाचे करणार होते. ते कधी करणार असा प्रश्‍न मामाने भाच्यांना केला. त्यातून रवींद्र व संभाजी यांचा वाद झाला. मद्यप्राशन केलेल्या संभाजीने रवींद्रवर चाकूने वार केला. मध्यस्थीसाठी आलेल्या लखनच्या हातावरही जखम झाली. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नाईक याला तातडीने अटक केली होती. सरकारपक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. हवालदार रमा डांगे, महिला कर्मचारी वंदना मिसाळ यांचे सहकार्य लाभले.

दरम्यान यातील फिर्यादी लखन आणि त्याचा जखमी भाऊ रवी सुंगारे नाईक मामा असल्याने फितूर झाले होते. त्यांनी सरकारपक्षास मदत केली नाही. तरीही घटनास्थळाचे पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांच्या साक्षीपुराव्याच्या आधारे न्यायालयाने शिक्षा सुनावली.

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like