पुण्यात दिवसाढवळ्या तरुणावर सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले आहेत. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराहट निर्माण झाली आहे. हा प्रकार आज (रविवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास फन टाईम थिएटर समोर घडला. या घटनेत जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

रोहीत साळवी (वय- २७) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेत तो अतिशय गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिहंगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फन टाईम थिएटर समोर आज दुपारी साडेतीनच्या सुमारास रोहीत साळवी याच्यावर काही जणांनी धारदार शस्त्राने वार केले. यामध्य गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहीत याच्या तोंडावर वार करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. रोहीत साळवी याच्यावर कोणत्या कारणामुळे हल्ला करण्यात आला हे अद्याप समजू शकले नाही. तसेच त्याच्यावर हल्ला करणारे किती लोक होते हे देखील अद्याप समजू शकले नाही. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही तपासत आहेत.

दरम्यान, थिएटर समोर हा प्रकार घडल्याने या ठिकाणी एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.