Coronavirus Impact : फ्रान्समध्ये 1 कोटीहून अधिक ‘बेरोजगार’, सरकार देतेय ‘पगार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूच्या साथीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. साथीच्या रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून जगातील बहुतेक देशांनी लॉकडाऊन लागू केले आहे. या विषाणूमुळे जगातील अनेक देशांमध्ये उद्योग ठप्प झाले आहे. याचा परिणाम अनेक लोकांच्या नोकऱ्या जात असल्याने ते बेरोजगार होत आहेत. फ्रान्समध्येही खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे एक कोटीहून अधिक कर्मचाऱी बेरोजगार झाले आहेत.

खसगी क्षेत्रातील प्रत्येक दोन कर्मचाऱ्यांमागे एकाला कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे बेरोजगार कर्मचाऱ्यांना संकटाच्या वेळी सरकारकडून भरपाई देण्यात येत असल्याची माहिती बुधवारी सरकारने दिली. फ्रान्सचे कामगार मंत्री मुरिएल पेनीकोड यांनी एका चॅनेलला सांगितले की, आजपर्यंत सरकारकडून एक कोटी पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात आले आहे आणि दिले जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 17 मार्च रोजी देशातील सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आणि लोकांना घरात राहण्याचे आदेश लागू केले होते. तसेच कोणत्याही कंपनीला नुकसान होणार नाही याची कळजी घेतली जाईल असे सांगितले होते. यासाठी मॅक्रॉनच्या सरकारने आर्थिक मदतीचे पॅकेज जाहिर केले आहे. सरकारने मागील आठवड्यात पॅकेज वाढवून 110 अब्ज युरो केले आहे.