दहावीचे हॉल तिकीट आजपासून ऑनलाइन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – १०वी आणि १२वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्यासाठी खूप महत्तवपूर्ण मानल्या जातात. १० वी आणि १२ वी च्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यंदा १०वी च्या विद्यर्थ्यांना परीक्षेचे हॉलतिकीट आता ऑनलाईन उपलब्ध केले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये मार्च २०१९ मध्ये होणार्‍या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे (इ. १० वी) हॉल तिकीट बुधवार (दि. ३०) पासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती, मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

येथे उपलब्ध होणार हॉल तिकीट

मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता दहावी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या www.mahasscboard.in अथवा www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर शाळांच्या लॉग इनमध्ये डाउनलोड करण्याकरिता उपलब्ध होतील. यासंदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा आहे.