सोन्याचे दागिने खरेदी करण्यासंदर्भातील नियम लागू करण्याची प्रक्रिया सुरू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्यासंबंधित एका नियमाची घोषणा केली आहे. कॅबिनेट मंत्री रामविलास पासवान (Minister of Consumer Affiars) यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करण्याशी संबंधित प्रोसेस सुरु करण्यात आली आहे. यासाठी सर्वच उत्पादकांना आपल्या कंपन्यांची नोंद करणं गरजेचं आहे.” ज्वेलर्सना आता लायसन्स घ्यावं लागणार आहे याशिवाय याचाही तपशील द्यावा लागणार आहे की दागिण्यांमध्ये सोनं किती प्रमाणात आहे आणि इतर धातू किती आहेत.

सोन्याचे दागिने खरेदी करण्यांवर हा होईल परिणाम
केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया सांगतात की, देशात सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग करणं याआधी ऐच्छिक होतं. आता नवीन नियम लागू झाल्यानंतर सर्व ज्वेलर्सना दागिने विकण्याआधी हॉलमार्किंग करणं अनिवार्य आहे. याआधी सोन्याच्या दागिन्यांचा दर्जा तपासण्यासाठी कोणतीही तपास यंत्रणा नव्हती. अशात अनेक ग्राहकांना 22 कॅरेटऐवजी 21 किंवा इतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार कमी कॅरेटचं सोनं विकलं जात आहे. परंतु त्यांच्याकडून घेतली जाणारी रक्कम मात्र चांगल्या दर्जाच्या सोन्याची घेतली जात होती.

नियम मान्य न केल्यास होणार शिक्षा
रामविलास पासवान म्हणाले, “देशात 324 जिल्ह्यात 892 हॉलमार्किंग केंद्र बनवण्यात आले आहेत. जर कोणी फसवणूक केली तर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायदेशीर प्रक्रिया पार पाडत त्यांना शिक्षा केली जाईल. ग्राहकांसाठी ग्राहक मंच हेल्पलाईनही तयार करण्यात आलं आहे. बीआयएस ज्वेलर्सकडून केल्या जाणाऱ्या ऑनलाईन रजिस्टरला सोपं बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

सरकार 14 कॅरेट, 16 कॅरेट, 18 कॅरेट, 20 कॅरेट, 22 कॅरेटच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य करणार आहे. याशिवाय 400 ते 500 नवीन असेसिंग सेंटर खोलणार आहे. सध्या देशात 700 हून अधिक असेसिंग सेंटर आहेत. सरकारला वाटत आहे की आणखी असेसिंग सेंटरची आवश्यकता आहे.

ग्रामीण ज्वेलर्सवर सरकार कारवाई करणार नाही
ग्रामीण क्षेत्रांपर्यंत पोहोच वाढवण्यासाठी 1 वर्षापर्यंत वेळ दिला जाणार आहे. यादरम्यान सरकार ज्वेलर्सवर कोणतीही कारवाई करणार नाही. नवीन हॉलमार्किंगचा नियम लागू झाल्यानंतर आता बीआयएस ग्राहकांना हॉलमार्किंग दागिने घेण्याबाबत जागृत करणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like