अवैध्यरित्या पाकिस्तानात गेलेल्या ‘त्या’ भारतीय नागरिकाची आज सुटका !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सहा वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका भारतीय तरूणाची पाकिस्तानी मुलीशी मैत्री झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलीला भेटण्यासाठी त्याने अवैध्यरित्या पाकिस्तान गाठले. पण, पाकिस्तानमध्ये त्याला अटक करण्यात आले.हमीद अन्सारी असे त्या व्यक्तीचे नाव आहे . त्याच्या वर पाकिस्तानात घुसून हेरगिरीचा आरोप करण्यात आला . या प्रकरणी त्याला तीन वर्षे सक्‍तमजूरीची  शिक्षा झाली होती
हमीद अन्सारी याची  सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पाकिस्तानी मुलीशी मैत्री झाली तीला भेटण्यासाठी तो नोव्हेंबर २०१२ रोजी अवैधपणे पाकिस्तानमध्ये गेले होता . त्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अन्सारी ला  पकडले होते. २०१२ मध्ये हमीद अन्सारी याला  ‘हमजा’ या खोट्या नावाने कागदपत्रे बनवून पाकिस्तानामध्ये घुसखोरी केल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला होता. घुसखोरी केल्याचा आरोप करत त्याला  तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, शिक्षा पूर्ण भोगल्यानंतरही पाकिस्तानने अन्सारी याची सुटका केली  नाही. त्यानंतर अन्सारी यांच्या वकिलांनी पेशावर उच्च न्यायालयाकडे दाद मागितली. अखेर आज त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. हमीद अन्सारी हा  मुंबईचा रहिवासी आहेत.
आईने दिला लढा 
पाकिस्‍तानमध्ये कोणत्याही कागदपत्राशिवाय पोहचलेला हमीद अन्‍सारी आज सहा वर्षानंतर आपल्या कुटुंबियांना भेटणार आहे. हमीद अन्‍सारी याची आई फौजिया यांनी सलग सहा वर्षे आपल्या मुलासाठी न्यायालयीन लढा दिला.हमीद याच्या सुटकेसाठी त्याच्या आईकडून कोणतीही कसर सोडण्यात आली नाही. पाकिस्‍तान आणि भारत या दोन्‍ही देशांच्या पंतप्रधान, राष्ट्रपती ते यूएन ते अगदी रेडक्रॉसपर्यंत त्यांनी लढा दिला. हमीद यांच्यासाठी त्यांनी पेशावर न्यायालयात लढा दिला. या लढ्याबाबत माध्यमांशी बोलताना त्या सांगतात की, हमीदच्या सुटकेसाठी पाकिस्‍तानमध्ये अनेक वार्‍या केल्या. त्याचा हिशोब सांगता येणार नाही. न्यायालयानी लढा देण्यासाठीभरपूर कागदपत्रांची जमवाजमव केली, अस त्या सांगतात.
१६ डिसेंबर रोजी त्यांच्या शिक्षेचा कालावधी संपला होता. पेशावर तुरुंगात असताना त्यांच्यावर एकदा कैद्यांकडून हल्‍ला करण्यात आला होता. शिक्षा भोगत असताना आणि त्यांच्या आईकडून न्‍यायालयनी लढाई असताना पाकिस्‍तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसी ही संस्‍था त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती.