८ वर्षाचा मुलगा आणि जवानाच्या नात्यावर आधारित ‘हामिद’चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- सध्या देशात काश्मीर हा चर्चेचा मुद्दा आहे. येथील दहशतवाद आणि तेथील लोकांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रपट होत असतात. असाच एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक ऐजाज खान यांनी या गंभीर विषयावर ‘हमिद’ नावाचा चित्रपट बनवला आहे.

हा चित्रपट एक सीआरपीएफ जवान आणि आठ वर्षाच्या लहान मुलाच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटातील आठ वर्षाच्या मुलाला एक नंबर मिळतो आणि तो त्या नंबरवर फोन करतो. तो फोन एका भारतीय जवानाला लागतो. त्यानंतर हामिद जवानाला तुम्ही अल्ला आहात का असा प्रश्न विचारतो. जवान त्या लहान मुलाच्या प्रश्नाला उत्तर देत हा मी अल्ला आहे असे म्हणतो. त्यानंतर त्यांच्यात निर्माण झालेल्या गोड नात्याचे दर्शन या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

हा चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित होणार आहे. पूर्वी हा चित्रपट १ मार्चला प्रदर्शित होणार होता. परंतू पुलवामामधील हल्ल्यामुळे देशात संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे त्यांनी प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली.

दरम्यान, देश दुख: आणि अशांतीच्या मार्गवर होता. आम्ही आमच्या देशा सोबत होतो. ‘हामिद’ हा सिनेमा शांती, प्रेम आणि एकमेकांच्या भावना समजण्याच्या विचारांवर आधरलेला आहे, अशी माहिती दिग्दर्शक ऐजाज खान यांनी दिली.