Hand Sanitizer : हँड सॅनिटायजर मुलांना करू शकते अंध, संशोधनात दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  सॅनिटायजरबाबत डॉक्टर सल्ला देतात की, कोरोना महामारीच्या दरम्यान याचा वापर आवश्यक आहे. परंतु, याच्या साइड इफेक्टसबाबत फ्रान्सच्या एका संशोधनात दावा करण्यात आला आहे जो आपल्या सर्वांसाठी चांगला नाही. यात म्हटले आहे की मुलांवर याचा वाईट परिणाम होत आहे. या संशोधनानुसार 2020 मध्ये 2019 च्या तुलनेत मुले जखमी होण्याच्या घटना 7 पटीने वाढल्या आहेत. सर्वात जास्त केस डोळ्यांच्या संबंधी आहेत. संशोधकांनी इशारा दिला आहे की, जर चुकीने सॅनिटायजर मुलांच्या डोळ्यात गेले तर हे त्यांना आंधळे बनवू शकते.

हँड सॅनिटायजरने आंधळेपणाचा धोका

फ्रेंच पॉयझन कंट्रोल सेंटरच्या आकड्यांवर नजर टाकली तर 1 एप्रिल 2020 पासून ऑगस्ट 2020 च्या दरम्यान सॅनिटायजरशी संबंधीत प्रकरणे 232 होती जी मागच्या वर्षी 33 होती. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी जगभरात सॅनिटायजरच्या वापरावर जोर दिला जात आहे. कोरोनामुळे जवळपास 70 टक्के अल्कोहोलयुक्त सॅनिटायजरचा वापर खुप वेगाने वाढला आहे. सॅनिटायजर कोरोना व्हायरस नष्ट करते.

कोरोनामुळे वाढला सॅनिटायजरचा वापर

कोरोनामुळे दुकाने, ट्रेन, घरांमध्ये प्रत्येक ठिकाणी सॅनिटायजरचा वापर वाढला आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायजर आतापर्यंत मोठ्या प्रमाणात विशेषकरून मुलांमध्ये वापरले जात आहे. भारतीय संशोधकांचे सुद्धा म्हणणे आहे की, सॅनिटायजर मुलांपासून दूर ठेवले पाहिजे. अशी दोन प्रकरणे आली आहेत ज्यामध्ये मुलांच्या डोळ्यात सॅनिटायजर गेल्याने त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करावे लागले.

सॅनिटायजर ऐवजी हात धुण्याचा सल्ला

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, लहान मुलांमध्ये सॅनिटायजर डोळ्यात गेल्याने गंभीर दुखापत किंवा अंध होण्याचा धोका आहे. बहुतांश सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायजर कमी उंचीवर ठेवले आहेत, ज्यामुळे मुलांच्या डोळ्यांना धोका असतो.