Sanitizer Side Effects : सॅनिटायझर एक शस्त्र असूनही शरीरास आहे फारच ‘घातक’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना विषाणूच्या युद्धामध्ये सॅनिटायझर एक शस्त्र आहे. परंतु, सॅनिटायझर्सचे बरेच दुष्परिणाम आहेत त्वचेसह शरीराच्या अनेक अवयवांसाठीदेखील ते धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे डॉक्टर सॅनिटायझरऐवजी साबण वापरण्याची शिफारस करतात. सॅनिटायझर शरीरासाठी हानिकारक कसे असू शकते ते पाहूया.

त्वचारोग किंवा एक्जिमा
सीडीसीनुसार साबणाने २० सेकंद हात धुवून कोरोना विषाणूचा संसर्ग टाळू शकता. आपत्कालीन परिस्थितीत अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरू शकता. परंतु, त्याचा नियमित वापर त्वचारोग किंवा एक्झामा अर्थात त्वचेमध्ये खाज सुटण्याची समस्या वाढवू शकतो. त्वचारोग किंवा एक्झामामुळे त्वचेवरील लालसरपणा, कोरडेपणा आणि क्रॅक वाढतात.

प्रजनन क्षमता
कॅलिफोर्निया विद्यापीठाचे डॉक्टर ख्रिस नॉरिस म्हणतात, की काही सॅनिटायझर्स अल्कोहोलयुक्त असतात. इथिल अल्कोहोल एंटीसेप्टिक म्हणून कार्य करते. तर काही नॉन-अल्कोहोलिक सॅनिटायझर्स आहेत. नॉन-अल्कोहोलिक सॅनिटायझर्स ट्रायक्लोझन किंवा ट्रायक्लोकार्बन सारख्या प्रतिजैविक कंपाऊंडचा वापर करतात. बर्‍याच अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की ट्रायक्लोसनचा प्रजननक्षमतेवर खूप वाईट परिणाम होतो.

हार्मोन्सवर वाईट परिणाम
एफडीएच्या मते, नॉन-अल्कोहोलिक सॅनिटायझर्समध्ये ट्रायक्लोझन हार्मोनल समस्यांसाठी जबाबदार असू शकतात. हार्मोन्सचा बिघडलेला संतुलन गंभीर समस्येस चालना देऊ शकतो.

मेथॅनॉलचे नुकसान
मिथेनॉल नावाचे एक विषारी रसायन काही सॅनिटायझर्समध्ये आढळते,. ज्यामुळे मळमळ, उलट्या, चक्कर येणे, निद्रानाश, अंधुक दृष्टी किंवा अंधत्व यांसारखे धोकादायक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. तुमच्या मज्जासंस्थेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे एखाद्यास मारू शकते.

रोग प्रतिकारकशक्ती घटते
रोगप्रतिकारक यंत्रणेच्या कार्यासाठी ट्रायक्लोसन चांगले नाही. जे मनुष्यांना रोगांपासून संरक्षण देते. कमकुवत रोगप्रतिकारक शक्तीमुळे रोग होण्याची शक्यता वाढते.

शरीराच्या विकासास अडथळा
हातातील सॅनिटायझर अधिक सुगंधित करण्यासाठी, त्यात फिथलेट्स आणि पॅराबेन्स यांसारख्या विषारी रसायनांचा वापर केला जातो. प्लेटलेट्स अंतःस्रावी विघटन करणारे असतात. जे मानवी विकास आणि पुनरुत्पादन प्रक्रियेस प्रतिबंध करतात. पॅराबेन्स हार्मोन्स, प्रजनन क्षमता आणि पुनरुत्पादक विकासासाठी हानिकारक असतात.