‘कोरोना’ संक्रमणापासून सर्वसामान्यांच्या बचावासाठी मोदी सरकारनं बदलले सॅनिटायझर विक्री संदर्भातील नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणू प्रतिबंधात काम करणाऱ्या हँड सॅनिटायझर संदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ते विकण्यासाठी सक्तीच्या परवान्यावरील नियम सुलभ करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. देशातील कोणत्याही दुकानात कोणत्याही अडचणीशिवाय सॅनिटायझर विकले जाऊ शकते. याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आहे. अधिकृत अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स नियमांच्या तरतुदीनुसार मंत्रालयाने ही सूट दिली आहे, परंतु त्याच वेळी ते म्हणाले की विक्रेते हे सुनिश्चित करतील की या उत्पादनांची विक्री व साठा त्यांच्या वापराच्या तारखेनंतर होणार नाही. सोमवारी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.

सॅनिटायझर विक्रीचे नियम झाले अधिक सुलभ
कोरोना साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने सॅनिटायझरची विक्री व साठा करण्याचा परवाना रद्द केला आहे, जेणेकरून ते लोकांमध्ये व्यापकपणे उपलब्ध होऊ शकेल. मंत्रालयाला अशा अनेक विनंत्या प्राप्त झाल्या होत्या, ज्यामध्ये सॅनिटायझरच्या विक्रीसाठी परवाना मिळण्यापासून सूट मिळावी अशी मागणी होत होती.

सरकारने काळ्या बाजाराच्या भीतीमुळे यापूर्वी हा निर्णय घेतला होता. तसेच, सॅनिटायझरची मागणी अचानक वाढल्यामुळे त्याचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढले होते.