महत्वपूर्ण …! दिव्यांगांना मिळणार दरमहा….. इतके रुपये 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन
निराधार आणि वयाची ६५ वर्ष पूर्ण झालेल्या तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांग व्यक्तींना दरमहा १ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. तसेच, या योजनेसाठीच्या आर्थिक निकषात २१ हजारावरुन ५० हजार रुपये करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3d8efc76-caf1-11e8-bedb-595448e40aa8′]
संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनेतील अर्थसहाय्य वाढवावे असा प्रस्ताव राज्यसरकारकडे होता. त्यानुसार संजय गांधी निराधार योजनेतील व्यक्तींना ४० ते ७९ टक्के अपंगत्वासाठी मासिक ८०० आणि त्यावर अपंगत्व असलेल्यांना मासिक १ हजार रुपये देण्यात येतील. या निर्णयाचा फायदा १ लाख ३५ हजार ५१२ दिव्यांग व्यक्तींना फायदा होणार आहे. या पुर्वी ४० ते ७८ अपंगत्वासाठी ६०० रुपये निवृत्तीवेतन देण्यात येत होते.
इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजनेत ८० टक्के ते त्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींचा समावेश होते. केंद्र पुरस्कृत योजनेमधून लाभार्थ्यांना दरमहा दोनशे रुपये निवृत्ती वेतन दिले जाते. याच लाभार्थ्यांना राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजनेतून दरमहा ४०० रुपये निवृत्ती वेतन देण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात सहाशेवरुन १ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी ३४ कोटी १३ लाख रुपयांच्या वार्षिक खर्चास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे.
 [amazon_link asins=’B016EOZ7OO,B073JYDK7P’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’84a9a77d-caf1-11e8-9796-975ba645529e’]
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५० हजार रुपयांपर्यंत असणाऱ्या आणि ६५ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधीर आणि मतीमंद प्रवर्गातील व्यक्तींना राज्याच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सहाय्य केले जाते. तसेच दारिद्र रेषेखालील कुटुंबातील ६५ वर्षे व त्या पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजनेतून आर्थिक सहाय्य केले जाते.
[amazon_link asins=’B072MFVNML,B00VT8CUHS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f396420f-caf1-11e8-9665-c71a7d30630c’]