महिलेनं उगारला ‘वर्दी’वर हात ! वाहतूक पोलिसाची पकडली ‘कॉलर’ अन् केली मारहाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   काळबादेवी परिसरात कॉटन एक्सचेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली. या महिलेने एका वाहतूक पोलिसाला (traffic police) शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली. या महिलेने चक्क कॉलर (coller) पकडून कानशिलात (beaten) लगावली. याप्रकरणी एल टी मार्ग पोलिसांनी बेड्या (arrest) घातल्या आहेत. सादविका रमाकांत तिवारी (वय-30 रा. मशीद बंदर) आणि मोहसीन निजामउद्दीन खान (वय-26 रा. भेंडी बाजार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.23) घडली आहे.

कॉटन एक्सचेंज नाका येथे ट्रॅफिक हवालदार आपले कर्तव्य बजावत असताना सादविका या महिलेसोबत एक इसम होता. त्याने हेल्मेट न घातल्याने त्यांना आडवण्यात आले. यावरुन महिलेने पोलीस हवालदार एकनाथ पार्टे यांच्यासोबत हुज्जत घालत त्यांना मारहाण केली. याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक दीपक निकम यांनी दिली.

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत संबंधित महिला वाहतूक पोलीसाने शिवीगाळ केल्याचे सांगत आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलेने रस्त्यावर लोकांना जमवून वाहतूक पोलीसाच्या श्रीमुखात लगावली. महिलेवर आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like