हाथरस प्रकरणातील नराधमांना फाशी द्या, बहुजन समाज पार्टीची राष्ट्रपतींकडे मागणी

भद्रावती : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तरप्रदेशातील हाथरस येथे घडलेल्या अमानविय घटनेतील नराधमांना फाशी देण्यात यावी, अशी मागणी करणारे एक निवेदन वरोरा – भद्रावती विधानसभा बहुजन समाज पार्टीतर्फे येथील तहसीलदारामार्फत भारताचे राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे.

उत्तरप्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंपदा पोलिस ठाण्याअंतर्गत बुलगडी गावातील वाल्मिकी समाजाच्या दलित युवतीवर उच्च वर्णीय समाजाच्या चार युवकांनी अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या केली. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणात सुरुवातीला आरोपिंना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच पिडीत युवतीला योग्य उपचारासाठी चांगल्या रुग्णालयात नेण्यात आले नाही. असाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती पंतप्रधान आणि केंद्रिय गृहमंत्र्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

निवेदन सादर करताना बसपा जिल्हा सचिव रत्नाकर साठे, उपाध्यक्ष विशाल बोरकर, सचिव रोशन नकबे, विधानसभा प्रभारी अशोक विश्वकर्मा, महेंद्र तितरे, मिलिंद शेंडे, प्रमोद चालखुरे, राजहंस मेश्राम, अमोल चालखुरे, नामदेव रामटेके, अशोक जवादे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.